हे तर शक्यच नाहीये की मेघालयला आलोय आणि ट्रेक केला नाही. म्हणूनच आम्ही आज भारतातला सर्वांत भयानक ट्रेक करण्यासाठी निघालो. मोरोखॉंग हे या ट्रेकच नाव. याला बांबू ट्रेक पण म्हणतात. वांखेन या गावातून हा ट्रेक सुरु होतो. दहा मिनिटं चालल्यावर एक भरी स्पॉट लागला आणि माझं मन फ्रेश झालं.

चला करुया भारतातल्या स्कॉटलंडची सफर
उम्र्यू नदी हा ट्रेक करताना पूर्णवेळ आपल्याला साथ देते. प्रत्येक वळणावर तिचं साैंदर्य अधिक खुलत जातं आणि आपण अधिक मंत्रमुग्ध होत जातो. खासी डोंगररांगांमध्ये हा ट्रेक अगदी दडला आहे. जशी नदी लागते तसे बांबूपासून तयार केलेले ब्रिज सुरू होतात. पावलोपावली असे छोटे आणि मोठेही ब्रिज होते.
एका ठिकाणी तर खाली खोल दरी आणि फक्त 3 बांबूंपासून ब्रिज तयार केले होते. त्यांच्यावरून चालताना बांबूंचा कारकुर आवाज मनात धडकी भरवत होता. आम्ही समिट करून परत येताना तर उतरताना चा प्रवास आणखी भीतीदायक होता.
पटापट खाली उतरल्यावर आम्ही नदीमध्ये डुबकी घेतली. त्या नदीचं पाणी प्रचंड स्वच्छ आणि थंड होतं. आम्ही चक्क पाण्यात झोपून गेलो. त्या नदीच्या पाण्यात तास दिडतास मस्त बसल्यावर आमचा सगळा शीण निघून गेला. आता पोटात कावळे कोकायला लागले होते. आम्ही चेरापुंजी मधील ऑरेंज रुटस हॉटेल मध्ये जेवलो. बऱ्याच दिवसांनी घरच्यासारखं जेवण मिळालं आणि मन तृप्त झालं. हॉटेलच्या बाहेर एक छोटा मुलगा दालचिनी विकत होता. त्याने आम्हाला मेघालयात वापरल्या जाणाऱ्या खासी भाषेतले 3 शब्द शिकवले.
1. खुब्लेलाई - Thank You
2. उम्लेलाई - Welcome
3. हॉ - Bye
त्यानंतर कुडकुडणाऱ्या थंडीत रूमवर जाऊन मस्त पडी घेतली. आज माझ्यातला ट्रेकर फुल्ल खुश होता.
आणखी फोटो, व्हिडिओ पाहण्यासाठी यावर क्लिक करा