अबब! तब्बल सात किलोमीटर उंच धबधब्याची सैर

हर्षदा कोतवाल
Wednesday, 4 December 2019

नोहकालिकायला जाताना घाट रस्ता लागला आणि काहीच वेळ गेल्यावर काकांनी रस्त्याच्यामध्येच गाडी थांबविली. म्हणाले उतरा खाली आणि पायवाट दिसते तसे चालत जा. सुरवातीला तर पायवाट नव्हतीच, सरळ सरळ दगडं उतरत खाली गेलो. म्हणलं अरे या काकांनी काय तरी खूप पांचट दाखवायला थांबवलं असणार.

मेघालयातील पहिल्याच दिवशी मी अत्यंत खास आणि सिक्रेट धबधब्यावर माझा दिवस घालवला. निळशार आकाश आणि कदाचित त्याहूनही निळशार पाणी असा तो भन्नाट अनुभव. त्यानंतर एकच दिवस मध्ये गेला आणि मी तासाभरात तीन धबधब्यांची सैर केली. दांतलेन, वी सोडंग आणि नोहकालिकाय. 

मेघालय आये और ट्रेक नही किया??

यातला नोहकालिकाय हा भारतातला सर्वांत उंच धबधबा म्हणून ओळखला जातो. हा धबधबा चेरापुंजीत आहे. चेरापुंजी म्हणजे पृथ्वीवरील सर्वांत जास्त पाऊस पडणाऱ्या ठिकाणांपैकी एक. या धबधब्याबद्दल खूप ऐकलं आणि वाचलं होतं म्हणून माझी उत्सुकता खूपच शिगेला पोहोचली होती. 

मात्र, ही उत्कंठा अजून काही काळ अशीच राहणार होती. कारण त्यापूर्वी आम्ही दान्थलेन वॉटरफॉल्स पाहण्यासाठी गेलो. आयुष्यात पहिल्यांदा मी एखाद्या धबधब्या कमोर किंवा खाली उभी नसून त्याच्या माथ्यावर उभी होते. एवढ्या उंचीवरुन धबधब खाली कोठे संपतो हे पाहण्याची हिंमत काही झाली नाही. 

Image may contain: outdoor, nature and water

त्यानंतर आम्ही नोहकालिकायच्या दिशेने निघाले. मात्र, वाटेत आणखी एक सरप्राईज आमची वाट पाहत होतं. आम्ही कोणत्या वॉटरफॉलला चाललोय हे फक्त आमच्या ड्रायव्हर काकांनाच माहीत होतं. ते आम्हाला म्हणले, ''आपको एक सरप्राईज देता हूं'' आमच्या काकांच हिंदी फारच मधूर आणि रसाळ वाटायचं. तोडकं मोडकं हिंदी बोलताना ते 'श'ला 'च' तर 'च'ला 'छ' म्हणायचे. त्यांचं हिंदी बाळ नुकतंच बोलायला शिकल्याप्रमाणे गोड वाटायचं. मागील दोन दिवसांत मेघालयाच्या सौदर्यांवर पूर्ण विश्वास बसला होता, त्यामुळेच आम्हीही त्यांना नाही म्हणालो नाही. 

चला करुया भारतातल्या स्कॉटलंडची सफर

नोहकालिकायला जाताना घाट रस्ता लागला आणि काहीच वेळ गेल्यावर काकांनी रस्त्याच्यामध्येच गाडी थांबविली. म्हणाले उतरा खाली आणि पायवाट दिसते तसे चालत जा. सुरवातीला तर पायवाट नव्हतीच, सरळ सरळ दगडं उतरत खाली गेलो. म्हणलं अरे या काकांनी काय तरी खूप पांचट दाखवायला थांबवलं असणार. थोडं खाली गेल्यावर पायवाट दिसू लागली. पायवाट तर दिसली पण माणसांचं काय? घनदाट जंगल होतं ते पण एक चिटपाखरुही नाही. आतापर्यंत एकच रस्ता होता म्हणून चालत होतो आता मात्र, समोर दोन वाटा दिसल्या. जायचं नक्की कुठल्या दिशेने? उषाला म्हणलं तू डावीकडून बघ रस्ता आहे का मी उजवीकडून बघते. 

दोघीपण निघालो मग वेगवेगळ्या दिशेने. मी ज्या दिशेने गेले तिकडे पूर्ण शांतता होती. उषाच्या ज्या दिशेने गेले तिकडे मात्र, पाण्याचा खळखळ आवाज येत होता. तिच दिशा बरोबर होती. तिनी आवाज दिला तशी मी मागे फिरले आणि आम्ही आवाजाचा पाठलाग करत खाली जाऊ लागलो. हळूहळू पाण्याचा आवाज स्पष्ट होऊ लागला. वळसा घालून समोर आलो आणि पाहतो तर एक, दोन नाही तब्बल तीन मजल्यांचा धबधबा आमच्यासमोर वाहत होता.

Image may contain: tree, plant, outdoor, nature and water

त्या खराब, उखडलेल्या, मुरुन टाकलेल्या घाट रस्त्याच्या मध्यात आमची गाडी उभी केली तेव्हा वाटलंही नव्हती की आत या जंगलात असं काहीतरी दडलं असेल. भल्या मोठ्या उंचीवरुन कोसळणारा तो धबधबा प्रत्येक थरावर आपल्या पोटात अमाप पाणी साठवून घेत होता तरीही प्रत्येक थरावर वरुन भरपूर पाणी कोसळत होतं. डोंगराच्या कुशीत दडून बसलेला हा धबधबा माझं मन अगदी तृप्त करुन गेला. गाडीत बसल्या बसल्या काकांना म्हटलं काय भन्नाट जागा दाखवलित तुम्ही! ते म्हणाले, आपल्यातच ठेवा, कुणाला फारशी माहित नाहीये ही.. आणि मला उगाच खूप भारी वाटलं. 

Image may contain: tree, outdoor and nature

आणखी फोटो, व्हिडिओ पाहण्यासाठी यावर क्लिक करा 

नोहकालिकाय- Jump of Lady Likai
आता आम्ही अखेर नोहकालिकायची वाट धरली होती. जसा जसा धबधबा जवळ येऊ लागला तशी थंडी वाढली. वातावरण क्षणाक्षणाला बदलत गेलं. सांगायचंच झालं तर अगदी दगडूशेठ मंदिरापाशी कडक ऊन पडलं होतं आणि तेच मंडईपर्यंत जावं तर एक फूटावरचा माणूसपण धुक्यात हरवून गेला. आता कसला दिसतोय म्हटलं हा धबधबा. माझा तर सगळा मूडच गेला. पुढच्या केवळ दोन मिनिटांत कोणतीरी त्या ढगांवर फुंकर मारुन त्यांना बाजूला करावे असे सारे ढग गायब झाले आणि माझ्या डोळ्यासमोर भल्या मोठ्या उंचीवरुन कोसळणारा तो धबाधबा दिसू लागला. आम्ही बराच लांबून तो धबधबा पाहत होतो तरीही तो किती भारी दिसत होता यावरुन त्याची भव्यता जाणवली. 

त्याच्यासमोर आवाक होऊन आम्ही उभे होतो तर त्या धबधब्याची अनोखी आणि दु:खद गोष्ट आमच्या काकांनी आम्हाला सांगितली. ती अशी होती-
मेघालयाच्या लोकांच्या सांगण्यानुसार इथे एक लिकाय नावाची बाई आपला नवरा आणि छोट्याशा मुलीसह राहत होती. मात्र, एक दिवस अचानक तिच्या नवऱ्याचा मृत्यू होतो. पोटापाण्यासाठी तिने कामाला जाण्यास सुरवात केली आणि मुलीला बापाची माया मिळावी म्हणून दुसरं लग्नही केलं. कामावरुन परतल्यावर ती जास्तीत जास्त वेळ आपल्या लहान मुलीसोबत घालवायची. त्यामुळे तिचं तिच्या नवऱ्याकडे मात्र दुर्लक्ष होत होतं. याचा राग हळूहळू त्याच्या मनात साठत गेला. 

Image may contain: mountain, outdoor, nature and water

त्याच्या द्वेषाची आग एक दिवस इतकी वाढली की त्याने ती घरी नसताना तिच्या मुलीला मारुन टाकलं. तिची हाडं त्याने फेकून दिली आणि उरलेल्या मांसाचं त्यानं जेवणं तयार केलं आणि तो घरुन निघून गेला. नेहमीप्रमाणे लिकाय कामावरुन घरी आली मात्र, घरात मुलगी आणि तिचा नवरा दोघेही नव्हते. प्रचंड भूक लागल्याने तिने तयार जेवण खाऊन घेतले. जेवणानंतर सुपारी खाण्याची सवय असल्याने ती सुपारीच्या डब्यापाशी गेली मात्र, तिथे तिला एक करंगळी सापडली. 

आता मात्र, सारा प्रकार तिच्या लक्षात आला. आपण आपल्याच मुलीचं मांस खाल्ल्यचे समजताच तिला वेड लागलं. या सर्वांत तिनं तिच्या नवऱ्याला मारुन टाकलं आणि या धक्क्यातून न सावरलेल्या तिने थेट घराबाहेर धाव घेतली आणि या धबधब्यावरुन उडी टाकून आत्महत्या केली. 

मेघालयमध्ये वापरल्या जाणाऱ्या खासी भाषेत नोह म्हणजे उडी (Jump) का हा स्त्रीच्या आधी वापरले जाणारे सर्वनाम आहे तर लिकाय हे तिचं नाव. अशा तऱ्हेने या धबधब्याचे नाव नोहकालिकाय म्हणजेच Jump of Lady Likai असे पडले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Travel Blog of Wei Sawdong and Nohkalikai waterfalls by Harshada Kotwal