हिवाळा संपला की हे हॉटेल बनतं नदी! माहित करून घ्या बर्फाच्या हॉटेलबद्दल

ice hotel
ice hotel

नवी दिल्ली: जगभरातील काही प्रसिध्द कलाकृती पाहून तुम्ही हैरान होऊन जाल. तुम्हाला माहित आहे का की जगात असंही एक हॉटेल आहे जिथं थंडी संपल्यानंतर ते वितळून नदी बनतं. हजारो बेट, तलावं, पर्वत आणि हिरवीगार जंगले श्रीमंत पर्यटकांचे मोठे आकर्षण केंद्र आहेत.

परंतु हे सर्व असूनही, सर्वात खास येथे एक हॉटेल आहे जे पूर्णपणे बर्फाने बनलेले आहे. या हॉटेलला स्वीडनचे आईस हॉटेल म्हणून ओळखलं जातं. या हॉटेलमध्ये भिंती, फर्निचर, बार इत्यादी सर्वकाही बर्फाने बनविलेले आहे.

प्रत्येक वर्षी हे हॉटेल हिवाळ्याच्या हंगामात म्हणजेच डिसेंबर ते एप्रिलमध्ये पर्यटकांसाठी बर्फाचे बनवले जाते. हिमवर्षावापासून पूर्णपणे तयार केलेले हे हॉटेल वसंत ऋतू  होताच पूर्णपणे वितळते आणि नदी बनते. हे हॉटेल टॉर्न नदीपासून उगम पावते.

2016 मध्ये या हॉटेलच्या काही भागांना कायमस्वरुपी बनवलं आहे. हे सोलर पावर्ड कूलिंग टेक्नॉलॉजीमुळे शक्य होऊ शकलं. हे हॉटेल जगभरातील पर्यटकांमध्ये मोठं प्रसिध्द स्थान आहे.

हे हॉटेल प्रथम 1992 मध्ये सुरु झाले होते. बर्फाने बनविलेले एक कॉम्प्लेक्स, रेस्टॉरंट, सोहळा हॉल यासारख्या बर्‍याच सविधा या हॉटेलमध्ये मिळत असतात. हॉटेलमध्ये लिव्हिंग ओशन स्वीट देखील आहे, जे इंग्लंडचे डिझायनर जोनाथन ग्रीन यांनी डिझाइन केलेले आहे. या सुटमध्ये कोरल आणि मासे आहेत, ज्यामुळे या हॉटेलला आणखी एक आकर्षक देखावा मिळेल. दरवर्षी लाखो पर्यटक हॉटेलला भेट देतात. हॉटेल दरवर्षी एप्रिलच्या मध्यापर्यंत चालू असते.

(edited by- pramod sarawale)


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com