Amrut kalash: समुद्र मंथनातून बाहेर पडलेला कलश या ठिकाणी सापडला!

कलश आणि शिवलिंगाचे अद्भूत रूप अचंबित करणारेच आहे
Amrut kalash
Amrut kalashesakal

Spiritual Story: देवाधिकांच्या काळात देव आणि दानवांचे नेहमीच भांडणं होत असायची. त्यात कोणते तरी देव मध्यस्थी करून वाद मिटवायचे आणि राक्षसाचा वध करायचे.

असेच एकदा देव आणि दानवांचे अमृत कलशावरून भांडण झालं. आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी भगवान शंकरांनी विषाचा कलश पिला आणि भांडण संपले.

देवकुळातील अनेक घटनांचे पुरावे आजकाल सापडतात. तर समुद्र मंथनातून आलेला कलश कुठे गेला असेल? काळाच्या ओघात तोही लुप्त झाला असेल असे सांगितले जाते. आता तो कलश सापडला असल्याचे दावे एका देशातील नागरीक करत आहेत.

spiritual story
spiritual storyesakal

समुद्र मंथनातून आलेला कलश इंडोनेशियातील एका मंदिरात होता, असा दावा करण्यात येत आहे. काय आह हा नक्की प्रकार पाहुया.

देवांच्या आणि राक्षसांचे युद्धानंतर समुद्रमंथन झाल्याची गोष्ट आपण ऐकली असेलच. एकीकडे देव, एकीकडे दानव, मधे पाणी घुसळण्यासाठी मंदार पर्वत आणि दोरखंडाच्या जागी वासुकी नाग होते. समुद्रमंथन झालं आणि अनेक मौल्यवान वस्तू, रत्न, प्राणी आणि स्वतः देवी लक्ष्मी त्यातून पुन्हा प्रगट झाल्या. यातूनच अमृतही आले.

अमृत मिळताच देव आणि दानवांत पुन्हा भांडण सुरु झाले. चढाओढ सुरु झाली. कोण अमृत प्राशन करेल यावरून पुन्हा युद्ध व्हायची शक्यता निर्माण झाली. त्याचवेळी भगवान श्री विष्णूने, एका सुंदर, मोहक आणि मादक स्त्रीचे रूप धारण केले. त्या रूपाला आपण विष्णूचे ‘मोहिनी रूप’ म्हणतो.

Amrut kalash
Goa Tour: नववर्षात गोव्याला जायचा प्लॅन आहे? तिकिटापासून ते पर्यटन स्थळांपर्यंत जाणून घ्या संपूर्ण माहिती
इंडोनेशियातील शिव शंकरांचे मंदिर
इंडोनेशियातील शिव शंकरांचे मंदिरesakal

याच मोहिनीने दानावांकडून तो अमृताचा घट काढून घेऊन देवांकडे सुपूर्द केला. ते अमृत भगवान शंकरांनी प्राशन केले आणि उरलेले अमृत लपवून ठेवण्यात आले. हेच उरलेले अमृत इंडोनेशियामध्ये सापडल्याचा दावा तिथल्या लोकांनी केला आहे.

मंदिरातील एका भिंतीवर महाभारताचे आदिपर्व कोरलेला आहे. 2016 मध्ये येथील पुरातत्व विभागाकडून दुरुस्तीचे काम केले जात होते, त्यानंतर या भिंतीच्या पायाभरणीतून तज्ज्ञांच्या टीमने या मंदिराबद्दल अधिक संशोधन केले. तज्ञांच्या टीमला एक तांब्याचा कलश सापडला. ज्यामध्ये एक पारदर्शक शिवलिंग जोडलेले होते. त्यात एक विशेष द्रव भरलेला होता.

Amrut kalash
National Tourism Day 2023: कोकणात जातच आहात तर यंदाच्या गणेश जयंतीला पेशवेकालीन अती प्राचीन मंदिराला भेट द्या!
या मंदिराची रचना अचंबित करणारी आहे
या मंदिराची रचना अचंबित करणारी आहेesakal

या मंदिरात हिंदू संस्कृती दर्शवणारी अनेक चित्र, कोरीव कलाकृती, मूर्ती इत्यादी सापडल्या आहेत.  मंदिरातील खजुराहोसारख्या 'कामात गुंतलेल्या' मूर्ती आणि केवळ एकाच भिंतीवर आदिपर्वाची उपस्थिती आश्चर्यचकित करते.

Amrut kalash
Goa Tour Plan: गोव्यात या गोष्टी फुकटात असताना तूम्ही परदेशात कशाला जाताय?

या कलशाची कार्बन कोटिंग साधारण १२व्या शतकातील असल्याचे म्हटले जाते. या काळात मलेशिया हे पूर्णपणे हिंदू राष्ट्र होते. पण १५व्या शतकात इस्लामचा धोका निर्माण झाला. तेव्हा या मंदिरात ही दुर्मिळ वस्तू लपवण्यात आली असावी. या कलश आणि शिवलिंगासोबत इतर अनेक मौल्यवान रत्ने सापडली आहेत.

Amrut kalash
Farmer Study Tour : कृषी तंत्रज्ञानाचा आविष्काराचा शेतकऱ्यांना अनुभव; आधुनिक शेतीबद्दल माहिती

लावू पर्वतावरील कंडी सुकूह या शिव मंदिराची निर्मिती १४३७ इसवीसन पूर्वीची आहे. ईस्लामी आक्रमणात हे मंदिर उद्धवस्त करण्यात आलं होतं. १८१५ साली जेव्हा जवाचे राजा थॉमस राफ्लेस यांचा इथे दौरा झाला, तेव्हा पिरॅमिड स्वरूपी सुंदर मंदिराच्या जिर्णोद्धाराचे आदेश त्यांनी दिले आणि या मंदिराचे पुनर्निर्माण केले गेले.

Amrut kalash
World Tour Jobs : जगभर फिरण्याची हौस असेल तर करा 'हे' जॉब्स, तुम्हाला जगभर फिरता येईल
मंदिराच्या बाहेर असे अखंड शिळेतील नक्षीकाम आहे
मंदिराच्या बाहेर असे अखंड शिळेतील नक्षीकाम आहेesakal

त्या शिवलिंगाचे निर्माण एका तांब्याच्या कलशावर केले गेले आहे आणि त्या कलशात कुठला तरी पारदर्शक द्रव पदार्थ असल्याचं दिसून येत होतं. हा कलश सापडला तिथे वरच्या बाजूला अमृत मंथन असा शिलालेख आढळतो. त्यामूळे भगवान शंकरांचे अमृत हेच असावं असा दावा करण्यात आला आहे.

हा कलश सध्या संग्रहालयात आहे
हा कलश सध्या संग्रहालयात आहेesakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com