तुम्हाला तुमचा हनिमून आठवणीत ठेवायचांय? 'ही' आहेत बेस्ट ठिकाणं

honeymoon couple
honeymoon coupleesakal

जर तुम्हाला तुमचा हनिमून (honeymoon destination) आठवणीत ठेवायचा असेल तर भारतात अनेक ऑफबीट जागा आहेत. ज्या अत्यंत सुंदर आहेत. (places-for-honeymoon-destinations-marathi-news)

andaman nikobar
andaman nikobaresakal

अंदमान आणि निकोबार बेटे

अंदमान आणि निकोबार बेटे आपली शांत जागा, रोमांटिक वातावरण, उत्कृष्ट हॉटेल्स, आणि बरेचसे एडवेंचर स्पोर्ट्स आणि वाटर स्पोर्ट्स साठी प्रसिद्ध आहे. या सर्व गोष्टी अंदमान आणि निकोबारला विश्वातील एक उत्तम हनिमून स्थळ बनवतात. सी फूड खवय्यांसाठी देखील ही एक उत्तम जागा आहे, इथे तुम्ही भारतातील सर्वोत्कृष्ट सी फूडचा आनंद लुटू शकता.एकांत बेटावर प्रेमाचा उत्साह वेगळाच असतो. उत्साही पर्यटक कपल जानेवारी ते मे महिन्यामध्ये या ठिकाणी येतात.

keral
keralesakal

केरळ बॅकवॉटर

हनिमूनसाठी केरळ देखील एक भारी ठिकाण आहे. कोची पासून चित्तूर, कोट्टायम बोट फेरी हे याठिकाणाचे मुख्य आकर्षण आहे. इथल्या बॅकवॉटर ला गेलात तर सुंदर अनुभव अनुभवायला मिळेल. याठिकाणी वेगळ्या शैलीत तयार झालेले पूल त्याचबरोबर क्रूजचा मनसोक्त आनंद घेत हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद करू शकता.

ladakh
ladakhesakal
honeymoon couple
World Tourism Day Special : ‘रिस्पॉन्सिबल टुरिझम’ कोकणची गरज ; रोजगारनिर्मितीसाठी नव्या दिशा शोधाव्या लागणार

लडाखमध्ये कॅम्प

अनेक बाईक रायडर्स पर्यटनासाठी लडाखला पसंती देतात. जंस्कार खोरं, खर्डुंग-ला पास, हेमिस नॅशनल पार्क आणि स्पितुक गोम्पा हे इथली आकर्षणं आहेत. दरी, डोंगर आणि यावेळी रोमॅंटीक वातावरण कोणाला पाहायला आवडणार नाही. जर तुम्हाला हिमालयाची सुंदरता जवळून बघायची असेल तर तुम्ही लक्झरी टेंटमध्ये राहू शकता. सिंधू नदीच्या ठिकाणी सूर्यास्त वेळी सुंदर दिसणारा क्षण तुम्हाला फोटो मध्ये टिपता येईल.

rajasthan
rajasthanesakal

राजस्थान-गुजरात मध्ये वन्य जीव सफारी

जर तुम्ही राजस्थानला जात असाल, तर तुम्हाला सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध अनेक आकर्षणं पाहायला मिळतील. जोधपूर, उदयपूर, चित्तौडगड, रणथंबोर आणि जयपूर यांसारख्या शहरांमध्ये पर्यटनाचा आनंद लुटू शकता.ब्लॅकबक लॉज गुजरात मध्ये वेलवदर नॅशनल पार्क जवळ आहे. जिथे तुम्हाला सर्व सुख सुविधा मिळतील ज्या तुम्हाला हव्यास्या वाटतात. या ठिकाणी प्लंज पूल झोपडी मध्ये राहू शकता. ब्लॅक सफारी सोबत तुम्ही भटकंतीला जाऊ शकता. रात्री चांदण्यांच्या शीतल प्रकाशात जेवणाचा आनंद घेऊ शकता. रणथंबोर नॅशनल पार्क जवळ सुजाण लायन गार्डन मधिल प्राणी तुम्हाला पहावयास मिळतील.

honeymoon couple
कोरोना नंतर या ठिकाणांवर नक्की फिरायला जा..!
kashmir - tulip
kashmir - tulipesakal

काश्मीरची सैर - टुलीप सीजन

वसंत ऋतूच्या अगदी सुरुवातीला काश्मीरमध्ये सगळीकडे हिरवागार गालीचा असतो. नजर जाते त्या ठिकाणाप्रयंत सर्व भाग निसर्गसंपन्न दिसतो. वर्षभर काश्मिर एक वेगळा आनंद देऊन जातो. त्यातल्या त्यात ट्यूलिप फुलांचा बहार येतो त्या हंगामात विलोभनीय दृश्य पहावयास मिळते. हा सुंदर नजारा तुम्ही एप्रिल महिन्यापूर्वी पाहू शकता.

darjiling
darjilingesakal

दार्जिलिंग

दार्जिलिंग ही देशातील चहा उत्पादित करणार्‍यां ठिकाणा पैकी प्रमुख ठिकाण आहे. निसर्गाचा अदभूत नजारा आणि चहाच्या बागा आणि इथले रिसॉर्ट सुट्टीसाठी विशेष आकर्षण आहे.याचा अनुभव घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे चहाच्या इस्टेटवर मुक्काम करणे. ग्लेनबर्न टी इस्टेट हा डोंगरांतील भाग आपणास स्वर्गीय सुखाचा अनुभव देतो. वसाहती शैलीतील निवासचा तुम्ही अनुभव घेऊ शकता. चहाच्या अनेक जाती तुम्हाला याठिकाणी पहावयास मिळतील.

taj palace- hyderabad
taj palace- hyderabadesakal

ताज पॅलेस- हैदराबाद

जर तुम्ही एका वेगळ्या रोमांचक ठिकाणच्या शोधात असाल तर तुम्ही ताज फालकनुमा पॅलेस बुक करू शकता आणि या ठिकाणी असलेल्या भव्यतेचा अनुभव घेऊ शकता. एकेकाळी हैदराबादच्या निजामाचे असलेले हे निवासस्थान आता एका मोठ्या हॉटेलमध्ये परिवर्तित झाले आहे. आलिशान स्वरूपात असलेले हॉटेल 32 एकरामध्ये विस्तारलेले आहे. तुम्ही एका लक्झरी निवासाचा अनुभव या ठिकाणी घेऊ शकता. राजे शाही थाट तुम्हाला या ठिकाणी पहावयास मिळेल. या महालाच्या खाली असलेल्या घोडागाडी मध्ये तुम्ही सवार व्हा आणि भटकंती सुरू करा. या ठिकाणी असलेल्या सोयीसुविधा तुम्ही कल्पनासुद्धा करू शकणार नाही अशा आहेत. आपल्या जीवनसाथी बरोबर या ठिकाणचे पर्यटन तुम्हाला अविस्मरणीय राहिल.

hampi
hampiesakal

हंपीची सफर

ऐतिहासिक जे अविस्मरणीय ठिकाण आहेत त्यामध्ये हम्पी या क्षेत्राचा समावेश होतो. आपल्या पुरातत्व वास्तुकलेचे उत्कृष्ट नमुने या ठिकाणी तुम्हाला पाहावयास मिळतील. तुम्हाला जर ऑफबीट प्लॅनिंग हवी असेल तर हे ठिकाण नक्की निवडा आणि आपली भटकंती अविस्मरणीय बनवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com