esakal | उन्हाळ्यात जोडीदारासोबत फिरायला जाताय, मग 'येथे' जाच...
sakal

बोलून बातमी शोधा

sikkim

उन्हाळ्यात जोडीदारासोबत फिरायला जाताय, मग 'येथे' जाच...

sakal_logo
By
प्रमोद सरवळे

औरंगाबाद: बऱ्याच जणांना वाटते की भारतात उन्हाळ्यात जोडप्यांना फिरायला चांगली पर्यटनस्थळे किंवा ठिकाणे नाहीत. पण जर आपण नीट शोधली तर अशी अनेक ठिकाणे देशात आहेत जिथं तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत उन्हाळ्यातही आनंदात दिवस घालवू शकता. देशात अनेक निसर्ग सौंदर्याने नटलेली आणि सुंदर अशी स्थळे आहेत. सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात जोडप्यांना निवांत क्षण घालवायला खूप कमी वेळ मिळतो. अशात उन्हाळ्यात जर काही वेळ मिळत असेल तर जोडप्यांना फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. उन्हाळ्याच्या काळात एप्रिल ते जुलै दरम्यान जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत फिरण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला आज आम्ही देशातील अशा काही ठिकाणांची माहिती सांगणार आहोत.

  • कुर्ग

  • सिक्किम

  • पहलगाम

  • ऊटी

कुर्ग-

उन्हाळ्यात दक्षिण-भारत फिरायला कोण जातं असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. जर तुम्हीही असा विचार करत असाल तर तुम्ही चुकीचे आहात. कारण, हे ठिकाण कोणत्याही जोडप्यासाठी उत्तम रोमँटिक स्थानापेक्षा कमी नाही. इथली सुंदर दृश्ये आणि हिरव्यागार पसरलेला निसर्ग असल्याने हे ठिकाण कधीही भेट देण्यासाठी योग्य आहे. तसेच या ठिकाणी उन्हाळ्याच्या दिवसांत बरीच कुटुंबे फिरायला येतात. घटदाट वनांनी अच्छादलेली इथली डोंगरे, धबधबे आणि इतर अनेक रोमँटिक ठिकाणे आहेत.

कुर्ग

कुर्ग

सिक्किम-

दुक्षिण भारतानंतर देशातील पूर्वेकडे जाऊया. तसं पाहिलं तर पूर्व-भारतात जोडप्यांना फिरण्यासाठी अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत. परंतु, उन्हाळ्यातही सिक्किम हे पूर्व-भारतमधील जोडप्यांना भेट देण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. नद्या, पर्वत, तलाव आणि सुंदर धबधबे यांनी भरलेले हे स्थान स्वर्गापेक्षा कमी नाही. इथलं हवामान नेहमीच आनंददायी आणि आल्हाददायक असते. इथं ताशी व्यू पॉइंट, हनुमान टोक आणि त्सोमो लेक अशी अनेक सुंदर ठिकाणे आहेत.

सिक्किम

सिक्किम

पहलगाम-

जम्मू काश्मीरमध्ये कोणाला फिरायला आवडणार नाही? परंतु, जर उन्हाळ्यात जम्मू-काश्मीरमध्ये फिरण्यासारख्या ठिकाणांमध्ये पहलगमचे नाव सगळ्यात वर येत. हिल स्टेशन म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण कोणत्याही जोडप्यासाठी एकदम आवडचे ठरते. नैसर्गिक सौंदर्य, नयनरम्य परिसर आणि सुंदर दृश्ये इथली आकर्षणे आहेत. एप्रिल महिन्यात येथे जोडप्यांची गर्दी असते. पहलगाममध्ये तुम्ही बैसरन हिल्स, तुलियन लेक आणि बीटा व्हॅली यासारख्या सुंदर ठिकाणांना देखील भेट देऊ शकता.

पहलगाम

पहलगाम

ऊटी-

बरीच जोडपी आपल्या जोडीदारासह शिमला, मनाली, नैनिताल इत्यादी ठिकाणी फिरायला जातात. तर दुसऱ्याबाजूला दक्षिण भारतातील प्रसिद्ध ठिकाण ऊटीलाही तुम्ही जोडीदारासोबत फिरायला जाऊ शकतो. ऊटीला 'क्विन ऑफ हिल्स'ही म्हटले जाते. त्यामुळे उन्हाळ्यातही या भागात फिरायले जाणे जोडप्यांसाठी उत्तम पर्याय आहे.

ऊटी

ऊटी

loading image