Video: रेल्वे ट्रॅकवरची भाजी मंडई पाहिलीये का?

Folding Umbrella Market: थायलंडमधील फोल्डिंग अंब्रेला या भाजी मार्केटच्या मधून रेल्वे मार्ग जातो
Folding Umbrella Market
Folding Umbrella MarketEsakal

प्रवासी वाहतूक तसेच मालवाहतूकीसाठी जगभरातील बहुतांश देशांमध्ये रेल्वेचा (Railway) वापर केला जातो. यातील अनेक ट्रेन वैशिष्ट्यपुर्ण आहेत. याचपद्धतीने काही रेल्वेमार्गसुद्धा (Railway Track) विविध कारणांसाठी प्रसिद्ध आहेत. यातील अनेक रेल्वे मार्ग खूपच सुंदर आहेत तर काही खूपच विचित्र आहेत. आज आपण अशाच एका रेल्वे मार्गांची माहिती घेणार आहोत, जिथे रेल्वे लाईन मधल्या बाजारपेठेतून (Market) जातो. एवढेच नाही तर रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूला भाजीपाल्याची दुकाने थाटली आहेत.

रेल्वे ट्रॅकवरची भाजी मंडई (Vegetable market on the railway track)-

थायलंडच्या समुत सॉन्गखराम प्रांतात माइकलॉन्ग रेल्वे स्टेशन आहे. स्टेशनजवळील ट्रॅक शहराच्या मध्यभागातून जातात. आश्‍चर्याची बाब म्हणजे या मार्गावरच येथे सर्वात मोठी भाजी मंडई आहे. फोल्डिंग अंब्रेला मार्केट (Folding Umbrella Market) असे या मार्केटचे नाव आहे.

Folding Umbrella Market
Video : असा मिळाला आंदोलक विद्यार्थ्यांना शिक्षणमंत्र्यांचा घरचा पत्ता

गाडी आल्यावर दुकानांचे पडदे दुमडले जातात-

आता हे नाव काय असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण होत असेल. वास्तविक, अरुंद रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रेनच्या ट्रॅकला लागूनच भाजीपाल्याची दुकाने थाटली आहेत. येथून ट्रेन जायच्यावेळी तेवढ्या वेळेसाठी दुकानदार आपल्या दुकानाचे पडदे दुमडतात आणि ट्रेन तिथून पुढे गेल्यावर लगोलग दुकाने पूर्ववत सुर केली जातात.

बघायला जगभरातून लोक येतात (People from all over the world come to see)-

हा रेल्वे मार्ग इतका प्रसिद्ध आहे की, तो पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात. येथे एक रेल्वे मार्ग बाजाराच्या बरोबर मधून जातो. ग्राहकही येथे भाजीपाला खरेदी करण्यासाठी येतात, परंतु त्याहूनही अधिक पर्यटक हे ठिकाण पाहण्यासाठी येतात.

Folding Umbrella Market
Video: सागरी तटरक्षक दलाचं सामर्थ्य दाखवणारा व्हिडीओ

सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळेत भरतो बाजार-

हा फोल्डिंग बाजार सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत चालतो. भाज्यांशिवाय फळे, मांस, सीफूड आदी पदार्थही येथे मिळतात. थायलंड टुरिझम अथॉरिटीच्या म्हणण्यानुसार, हे दृश्य दिवसातून 8 वेळा पाहिले जाते. म्हणजेच ट्रेन महाचाई ते मायकेलॉन्ग पर्यंत एकूण 4 वेळा जाते आणि नंतर मायकेलॉन्गहून महाचाईला परत येते.

सीएनएन या इंग्रजी वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, मायकलॉन्ग स्टेशन बँकॉकपासून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर आहे. रेल्वेशिवाय हा मार्ग ओलांडण्यास दीड तास लागू शकतो, त्यामुळे बहुतांश प्रवाशांना रेल्वेने प्रवास करावा लागतो. याशिवाय मफावा फ्लोटिंग मार्केट देखील याच भागात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com