IRCTCतर्फे रामायण यात्रा; भारत गौरव योजनेंतर्गत पहिल्यांदाच 2 देशांना जोडणार

रामायण यात्रेचे हे टूर पॅकेज 17 दिवस आणि 18 रात्रीचे असेल.
irctc
irctcsakal

भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी नवनवीन पॅकेज आणत असते. अशातच IRCTC ही देशातील पहिली संस्था आहे जी पहिल्यांदाच 'भारत गौरव योजने' अंतर्गत दोन देशांना जोडून प्रवास करणार आहे. राम यात्रेच्या निमित्ताने ही रेल्वे श्री रामच्या निगडीत सर्व धार्मिक स्थळांना भेट देणार.

21जून ला ही ट्रेन दिल्लीहून निघणार आणि रामायण यात्रा पूर्ण करण्यासाठी भारत ते नेपाळ या देशातील 8000 किमी अंतर पूर्ण करणार. रामायण यात्रेचे हे टूर पॅकेज 17 दिवस आणि 18 रात्रीचे असेल.

irctc
पावसाळी पर्यटनाचा मनमुराद आनंद घ्यायचायं? 'या' ठिकाणी भेट द्या

या 18 दिवसांच्या यात्रेतील पहिले स्थळ रामजन्मभूमी अयोध्या असेल. यानंतर बक्सर येथील विश्वामित्र आश्रम आणि रामरेखा घाट येथे गंगा स्नान होणार. यानंतर ही स्पेशल ट्रेन सीतामढीला पोहोचेल, त्यानंतर अखेरीस माता सीतेचे जन्मस्थान जनकपूर येथे भेट दिली जाईल. हे जनकपूर नेपाळ मध्ये स्थित आहे. यानंतर ट्रेनचा पुढचा स्टॉप भोळे शहर काशी असेल. जेथे पर्यटक प्रयाग, शृंगवरपूर आणि चित्रकूट येथील मंदिरांसह धार्मिक स्थळांना भेट देऊ शकतील.

irctc
Photos: फक्त 70 हजार रुपयांमध्ये करू शकता 'या' सुंदर देशांची सैर

चित्रकूटनंतर ही गाडी भाविकांना थेट नाशिकच्या पंचवटी आणि त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी घेऊन जाईल. नाशिकनंतर हंपी या प्राचीन किष्किंधा शहरात भाविकांना दर्शन दिले जाणार आहे. येथे प्रवाशांना अंजनी पर्वतातील हनुमानाचे जन्मस्थान पाहता येणार. हंपीहून रामेश्वरमला पोहोचल्यावर तुम्हाला शिव मंदिर आणि धनुषकोडी पाहण्याची सुद्धा संधी मिळेल.शेवटी ही ट्रेन तेलंगणातील भद्राचलम येथे थांबेल. विशेष म्हणजे ही ट्रेन सुमारे 8000 किमीचा प्रवास पूर्ण करून 18 व्या दिवशी दिल्लीला परतेल.

irctc
प्रवासाला निघताय? आनंददायी प्रवासासाठी 'या' वस्तू सोबत असायलाच पाहिजेत

आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या ट्रेनला एसी डबे असतील. पर्यटकांना फक्त शुद्ध शाकाहारी जेवण दिले जाईल. 18 दिवसांच्या या प्रवासासाठी तुम्हाला एकूण 62,370 रुपये मोजावे लागतील. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे पॅकेज तुम्ही हप्त्यांवर देखील घेऊ शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रामायणात प्रवास करणाऱ्यांनी पूर्ण लसीकरण केले पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com