हनीमूनला जाण्यापूर्वी कपल्सनी लक्षात ठेवाव्यात या गोष्टी

लग्नानंतर हनीमूनला जाण्यासाठी कपल्स खूप उत्सुक असतात
honeymoon
honeymoonesakal
Summary

लग्नानंतर हनीमूनला जाण्यासाठी कपल्स खूप उत्सुक असतात.

लग्नानंतर हनीमूनला (Honeymoon) जाण्यासाठी कपल्स खूप उत्सुक असतात, पण हनीमूनला जाण्यापूर्वी अनेक वेळा कपल्स अशा चुका करतात, ज्यामुळे त्यांना नंतर काही गोष्टींचा पश्चात्ताप होतो. लग्नाआधी तुम्ही ज्या पद्धतीने प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंग करता, तसंच हनीमूनचं प्लॅनिंगही करायला हवं.

honeymoon
हनीमून प्लॅन करताय? गुजरातमधील 'या' पाच ठिकाणांना जरूर भेट द्या

नकळत होतात या चुका-

अचानक शेवटच्या वेळी कुठलीही जागा ठरवून तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत ती भेट खास बनवू शकता, असं वाटत असेल तर तसं मुळीच नाहीयेय. कारण असं केल्याने कळत-नकळत अशा अनेक चुका तुम्ही करत असता, ज्यानंतर तुम्हाला पश्चात्ताप होतो. चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या चुका आहेत ज्या तुम्ही हनीमूनला जाण्यापूर्वी विसरू नये.

घाईगडबडीत करू नका नियोजन-

घाईगडबडीत हनीमूनचं नियोजन कधीही करू नका. घाईगडबडीत, गोष्टी नेहमीच वाईट होतात. त्याचप्रमाणे हनीमूनला गेल्यावर घाईगडबडीत प्लॅनिंग केल्यामुळे आपण काही गोष्टी विसरून जातो. म्हणून हनीमूनला जाण्यापूर्वी आधी प्रत्येक गोष्टीची प्लॅनिंग करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्ही घरी काहीही विसरू नये.

honeymoon
हनीमून सेलिब्रेशनसाठी भारतातील परफेक्ट डेस्टिनेशन; एकवेळ भेट द्या

आधीच बुकिंग करा-

जर तुम्ही आधीच बुकिंग केलंत तर तुम्हाला जास्त खर्च येणार नाही. खरंच, बरेच लोक त्यांच्या हनीमूनबद्दल इतके उत्साही असतात की ते आधीच बुकिंग करत नाहीत, पण जर तुम्ही आधीच बुकिंग केलंत तर तुम्हाला तिथे जाऊन जास्त बजेटमध्ये रूम खरेदी करावी लागणार नाही आणि तुमचा वेळही वाचेल.

जोडीदाराचा सल्ला घ्या-

जोडीदाराचा सल्लाही खूप महत्त्वाचा असतो. काही कपल्स एकमेकांना विचारून सगळं प्लॅनिंग करतात, त्यामुळे अनेक जण आपल्या पार्टनरला काही विचारत नाहीत, यामुळे दोघांनाही फारशी मजा येत नाही. हनीमूनमध्ये मजा करण्यासाठी या दोघांचा आनंद खूप महत्त्वाचा असतो, असं मानलं जातं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com