दसऱ्याच्या सुट्टीत कमी बजेटमध्ये घ्या ट्रेकिंग, टुरिझमचा आनंद

 रामलिंग
रामलिंगGoogle

भारतात आज सगळीकडे दसरा (Dasara) हा सण आज साजरा केला जात आहे. दसरा या सणानिमित्त आज अनेकांना आॅफिशियल सुट्टी ही असेल. याला लागून शनिवार आणि रविवार आहे. यामुळे बरेच जण सुट्टी घेऊन ट्रिपचा प्लॅान करत असाल तर कोल्हापूर पासून अवघ्या ३० किलो मिटर अंतरावर हातकणंगले तालुक्यातील आळते डोंगरावर रामलिंग हे ठिकाण आहे. येथे तुम्हाला पर्यटना बरोबर ट्रेकिंगचा ही आनंद घेता येईल. याशिवाय एकाच ठिकाणी कुंथुगिरी, रामलिंग, आल्लमप्रभू, विपश्यना केंद्र आहे. यामुळे एकाच ठिकाणी कमी खर्चात तुम्हाला पर्यटन आणि ट्रेकिंगचा आनंद घेता येतो.

धार्मिक वातावरणात निसर्गसंपन्न परिसरात  फिरण्याचा आनंद वेगळाच असतो. आणि तो अनुभवण्यासाठी अनेक लोक या ठिकाणी येत असतात. सद्या धकाधकीच्या जिवनातुन विरंगुळा मिळविण्यासाठी अनेक लोक या परिसरात येत आहेत. गर्द झाडी आणि खडा चढ असल्यामुळे येथे ट्रेकिंगचा अनुभव देखील येथे घेता येतो. तसेच पायथ्याला रिसोर्ट आणि आद्य मराठी खाद्य संस्कृती देखील सुरु झाली आहे. याठिकाणी उडीद डाळी पासुन बनवलेले माडगे,  भरली वांगी, वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या, चुलिवरची भाकरी, आणि ग्रामिण जिवणाशी निगडीत अस्सल गावराण शाकाहारी जेवणाची सोय याठिकाणी आहे.नेमके काय आहे ठिकाण हे जाणून घेऊया.

रामलिंग: प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी
रामलिंग: प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमीGoogle

रामलिंग: प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी

 प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी असा पौराणिक इतिहास रामलिंग मंदिराला आहे. चारी बाजूने हिरवळ, कडक ऊन्हात ही अल्हाददायी, शांत असे वातावरण आहे.  श्री रामलिंग मंदीर हे एका अखंड दगडात कोरलेले असुन याठिकाणी महादेवाच्या पिंडीची पुजाअर्चा केली जाते. प्रभू रामचंद्र १४ वर्षाच्या वनवासात असताना याठिकाणी त्यांचे वास्तव होते अशी अख्यायिका आहे. आकर्षक प्रवेशद्वार ,तेथून पायवाटेने जाण्यासाठी पदपथ तयार करण्यात आले आहे. त्याचबरोबर भव्य आकर्षक असे बांबू हाउस उभारण्यात आले आहे. ओपन जीम,सोबत लहांना मुलांसाठी बोलोद्यान आहे.फोटोशुटसाठी निसर्गरम्य असे परफेक्ट ठिकाण आहे.

 श्री रामलिंग मंदीर हे एका अखंड दगडात कोरलेले असुन याठिकाणी महादेवाच्या पिंडीची पुजाअर्चा केली जाते.
श्री रामलिंग मंदीर हे एका अखंड दगडात कोरलेले असुन याठिकाणी महादेवाच्या पिंडीची पुजाअर्चा केली जाते. google

अल्लमप्रभु मंदिर

रामलिंग रस्त्याने अल्लमप्रभू कडे जाताना दोन्ही बाजूने असणारी गर्द झाडी मनाला वेगळा आनंद देणारी ठरते. डोंगर माथ्यावर  कुडलसंगम येथील बसव पिठाचे प्रथम शुन्य पिठादीश श्री अल्लमप्रभु यांचे मंदीर आहे. याठिकाणी साडे आठशे वर्षापासुन अखंड ज्योत तेवत आहे त्याचीच पुजा केली जाते. श्री अल्लमप्रभु यांची गुढी पाडव्यास जयंती असते त्या दिवशी येथे किरणोत्सव साजरा केला जातो. याठिकाणी जाण्य़ासाठी कच्चा रस्ता आहे. तुम्ही ट्रेकिंगसाठी हा पर्याय निवडू शकता. किंवा मोटरसायकल ने ही जाऊ शकता.

महाराष्ट्र व कर्नाटक मधील हजारो भाविकांचे श्रध्दास्थान

महाराष्ट्र व कर्नाटक मधील हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असेलेले धुळेश्वर मंदिर डोंगराच्या उत्तरेस आहे. या ठिकाणी श्री धुळेश्वर यांची पाठपुजा केली जाते. अतिशय सुंदर असे वातावरण याठिकाणी आहे.

डोंगराच्या पायथ्याशी  श्री. क्षेत्र कुंथुगिरी हे जैन समाजाचे धार्मिक क्षेत्र  आहे.
डोंगराच्या पायथ्याशी श्री. क्षेत्र कुंथुगिरी हे जैन समाजाचे धार्मिक क्षेत्र आहे.Google

श्री. क्षेत्र कुंथुगिरी

डोंगराच्या पायथ्याशी श्री. क्षेत्र कुंथुगिरी हे जैन समाजाचे धार्मिक क्षेत्र आहे. देशातील विविध भागातून भक्तगण आणि पर्यटक या ठिकाणी मोठ्या संख्येने येतात. या ठिकाणी भक्त निवास निवास आहे. त्यामुळे याठिकाणी तुम्ही २ ते ३ दिवस मुक्कामी राहू शकता. डोंगराच्या पायथ्याशी अतिशय सुंदर मूर्ती आहे. त्याला लागूनच भव्य मंदिर आणि लहान मुलांना खेळण्यास बगीचा आहे. निसर्गरम्य वातावरण, वनऔषधी झाडे, पक्षांचा किलबिलाट, मोरांचे दर्शन,भरपूर प्रमाणात शुध्द हवा आणि सात्विक जेवणाचा आनंद घेऊ शकता. याशिवाय ७ किलोमिटर डोंगरावर मिनी शिखरजी आहे. याठिकाणी २० तिर्थंकरांच्या मुर्ती बसवण्यात आली आहे. याठिकाणी तुम्ही शिखरजीचे दर्शन घेऊ शकता.

कुंथुगिरी लगतच विपश्यना केंद्र आहे. याठिकाणी तुम्हाला विपश्यना करता येते.
कुंथुगिरी लगतच विपश्यना केंद्र आहे. याठिकाणी तुम्हाला विपश्यना करता येते.Google

विपश्यना केंद्र

कुंथुगिरी लगतच विपश्यना केंद्र आहे.विपश्यना ही काळाची गरज आहे. आजकालच्या धकाधकीच्या जिवनात विपश्यनाची गरज अनेकांना जाणवू लागली आहे. मनाला शांती लाभण्य़ासाठी या केंद्रात विपश्यना करता येते. . मात्र यासाठी आॅनलाईन बुकिंग करावे लागते.

 कसे याल

रामलिंग हे ठिकाण कोल्हापूर –सांगली या राज्यमार्गावरील तालुका असलेल्या हातकणंगले या गावापासून ७ किलोमिटर अंतरावर आहे. कोल्हापूर,सांगली,मिरज याठीकानाहून रेल्वे आणि एस.टी. बसची सोय हातकणंगले पर्यंत आहे. तेथून खासगी वाहनाने या ठिकाणी जावे लागते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com