पुण्याजवळील पिकनीकला जायचे आहेत; तर हे आहेत स्पाॅट

पुण्याजवळील पिकनीकला जायचे आहेत;  तर हे आहेत स्पाॅट

जळगाव ः तुम्ही पुणे शहरात आहात आणि विकेंडला तुम्हाला बाहेर फिरायला जायचे आहे. तर पुणे शहरालगत तुम्हाला अनेक असे स्थळे आहेत जे तुम्हाला भरपुर निर्सग आणि एतिसाहीक स्थळे पाहण्यास मिळतील. पुणे शहराच्या दक्षिणेकडील पश्चिम घाट आणि उत्तरेकडील पर्वत रांगा आहे. पुण्याच्या पश्चिम घाटात ऐतिहासिक किल्ल्यांपासून, समुद्र किनारे, हिरवळ आणि सुंदर धबधब्यांपर्यंत बरेच उत्कृष्ट पिकनिक स्पॉट्स आहेत. एका दिवसात सुट्टी तुम्ही आनंदात घालू शकतात. तर चला जाणून घेवू कोणते ठिकाणे आदर्श आहेत.

खडकवासला

खडकवासला तलाव पुणेकरांसाठी फिरण्याचा आवडीचे ठिकाण आहे. खडकवासला धरणालगत सुंदर पथदिवे, विविध खाद्य पदार्थांचा आस्वाद लोकांना मिळतो. उत्तम पिकनिक स्पॉट म्हणून खडकवासला असून पुण्यापासून सुमारे २० कि.मी. अंतरावर आहे. एका तासाच्या अंतरावर तुम्ही जाऊ शकता. जवळच सिंहगड, पांचा आणि वारसगाव अशी प्रसिध्द ठिकाणे आहे. 

मुळशी 

मुळशी हे पुण्यापासून 47 किमी अंतरावर आणि पुण्याजवळील एक उत्तम ठिकाण आहे.  मुळशी तलाव खूप प्रसिद्ध आहे. मुळशी मधील हवामान वर्षभर चांगले असते, जे या जागेचे सौंदर्य वाढवते. वरसगाव धरण, टेमगड धरण आणि पानशेत ही मुळशी आसपासची काही मनोरंजक ठिकाणे आहेत ज्यातून आपण शोध घेऊ शकता. 

माळशेज घाट 

घन आणि सुंदर पश्चिम घाटांनी वेढलेला, माळशेज घाट एक चांगले ट्रेकिंगचे स्पाॅट आहेत. येथे पावसाळ्यात फिरण्याचा आनंद काही वेगळाच असतो. सुंदर धबधबे आणि फ्लेमिंगो ही येथे प्रमुख आकर्षणे आहेत. तसेच जवळील हरिश्चंद्रगड ट्रेकिंग साठी प्रसिध्द आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला जीवधान किल्ला, शिवनेरी किल्ला, लेन्याद्री लेणी आणि पिंपळगाव - जोगा धरण अशी बरीच ठिकाणे पाहायला मिळतात. 

सातारा

सातारा हे विविध निर्सग रम्य स्थळे, किल्ले, नद्या, डोंगररांगा भरलेले आहे. पुण्याजवळून साताराचे अंतर ११3 किमी आहे. हा सुंदर टेकड्यांचा एक भाग आहे. येथे कोयना आणि कृष्णासारख्या अनेक नद्या आहेत, ज्याच्या उपनद्या डोंगरावर सुंदरपणे वाहतात. इथल्या नदीकाठ्याव्यतिरिक्त अजिंक्यतारा किल्ला, कराड आणि कोटेश्वर मंदिर इतरही दर्शनासाठी आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com