चंदीगडला जाताय, तर 'या' चर्चंना भेट द्या!

चंदीगडमध्ये फक्त प्रसिद्ध गुरुद्वारेच नाहीत, तर येथे चर्चही आहेत. चंदीगड पंजाबची राजधानी आहे.
चंदीगडला जाताय, तर 'या' चर्चंना भेट द्या!

चंदीगडमध्ये (Chandigarh) फक्त प्रसिद्ध गुरुद्वारेच नाहीत, तर येथे सुंदर चर्चही आहेत. चंदीगड पंजाबची राजधानी आहे. त्यामुळे येथे मोठ्याप्रमाणावर पंजाबी लोक राहतात. येथे अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत. तसेच प्रसिद्ध गुरुद्वारे असून तसेच चर्चही आहेत (Visit Famous Churchs In Chandigarh Tourism News In Marathi) जाणून घ्या त्याविषयी..

व्हिक्ट्री प्रेयर टाॅवर (Victory Prayer Tower)

व्हिक्ट्री प्रेयर टाॅवर हे जाॅन्सन संगर यांनी बांधलेले चर्च आहे. हे चर्च आपल्या सौंदर्यासह वास्तुकला आणि अंतर्गत डिझाईनसाठी ओळखले जाते. व्हिट्री प्रेयर टाॅवर सेक्टर ३२ सी, चंदीगडमध्ये आहे. विशेषतः डिसेंबरमध्ये ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मोठ्यासंख्येने येथे येतात.

चंदीगडला जाताय, तर 'या' चर्चंना भेट द्या!
जाणून घ्या, उत्तर प्रदेशातील काही सर्वोत्तम राष्ट्रीय उद्यानांविषयी

२.राॅयल पॅरिश चर्च (Royal Parish Church)

राॅयल पॅरिश चर्च सेक्टर ९, मध्यमार्ग, चंदीगडमध्ये आहे. हे मोठे चर्च असून ख्रिस्ती बांधवांसह पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र आहे. ते ख्रिसमस, नवीन वर्ष आणि ईस्टर सेवांसाठी विशेष प्रसिद्ध आहे.

३. ख्राईस्ट चर्च, सीएनआय ( Christ Church CNI)

चंदीगडमधील सर्वात प्रसिद्ध चर्चामध्ये ख्राईस्ट चर्च एक आहे. ते सेक्टर १८ मध्ये आहे. चर्चची स्थापना न्युझिलंडमधील एका मिशनरीने केली होती. ते युथ फेलोशिप, विमेन फेलेशीप आणि संडे स्कूल सेवाही चालवल्या जातात. ख्राईस्ट चर्च आपल्या ख्रिसमस, नवीन वर्ष आणि ईस्टर सेवेसाठी ओळखले जाते.

४.फर्स्ट बॅप्टिस्ट चर्च (First Baptist Church)

फर्स्ट बॅप्टिस्ट चर्च सेक्टर ४४ सी मध्ये आहे. हे चर्च इंग्रजी व्यतिरिक्त तीन क्षेत्रीय भाषांमध्ये सेवे देते जसे की, तमिळ, नेपाळ आणि हिंदी.

५.मार थोमा चर्च (Mar Thoma Church)

मार थोमा चर्चचे ओरिजिन केरळमधील आहे. ते सर्वप्रथम थाॅमस यांनी सुरु केले होते. जे प्रभू येशूच्या १२ शिष्यांपैकी एक होते. द मार थोमा चर्च एअरपोर्ट चौक, रायपूर खुर्द, चंदीगडमध्ये आहे. ते विशेषतः परदेशी पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतात. चंदीगडमधील हे एक सर्वात सुंदर चर्चापैकी एक आहे. द मार थोमा चर्च 'लेसर ईस्टर्न चर्च'च्या अंतर्गत येते.

६.ख्राईस्ट द किंग कॅथेड्रल (Christ The King Cathedral)

ख्राईस्ट द किंग कॅथेड्रल, सेक्टर १९ सी मध्ये आहे. हे चंदीगडमधील सर्वांत मोठे चर्च आहे. चर्चची वास्तुकला आणि आंतरिक डिझाईन दोनही खूप अप्रतिम आहे.

७.अवर लेडी ऑफ वेलकन्नी चर्च (Our Ledy Of Velankanni Church)

अवर लेडी ऑफ वेलंकन्नी चर्च चंदीगडच्या सेक्टर २६ मध्ये आहे. तमिळनाडूमधील वेलंकन्नी येथील हे एक शाखा आहे. चर्चमधील अद्भूत वास्तुकला आहे. येथे तुम्हाला एक शांतीची अनुभूती मिळतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com