World's Happiest Countries : आनंदी आनंद गडे! जगातल्या आनंदी देशांच्या यादीत या देशांचा समावेश | World's Happiest Countries : The world's happiest countries for 2023 in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

World's Happiest Countries

World's Happiest Countries : आनंदी आनंद गडे! जगातल्या आनंदी देशांच्या यादीत या देशांचा समावेश

World's Happiest Countries 2023: दरवर्षी 20 मार्च रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय आनंदी दिन साजरा केला जातो. जगभरातील लोकांच्या जीवनात आनंद पसरवणे हा त्याचा उद्देश होता. या दिवशी जगात सर्वात जास्त आनंदी असलेल्या देशांची यादी जाहीर केली जाते.

या यादीत पहिला नंबर हा फिनलंडचा लागाला आहे. तर, टॉप २० मध्ये आशिया खंडातील एकही देश आनंदी नसल्याचे धक्कादायक वास्तवही समोर आले आहे.

युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने 2013 मध्ये हा उपक्रम सुरू केला. या यादीत सलग सहा वर्षे अव्वल स्थानी असलेला फिनलंड देश आहे. केवळ 5.5 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या या देशाने हॅपीनेसच्या क्रमवारीमध्ये 7.842 गुण मिळवले आहेत.

फिनलँडमधील लोक नेहमीच आनंदी

फिनलँडमधील लोक नेहमीच आनंदी

कसं ठरवंल जातं

देश आनंदी आहे की नाही हे ठरवण्यासाठी रँकिंग दिले जाते. एखादा देश किती आनंदी आहे हे त्याचे जीडीपी, जीवनमान आणि लोकांचे आयुर्मान यावरून ठरवले जाते. युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्कने जाहीर केलेल्या क्रमवारीत 150 देशांचा समावेश आहे.

डेन्मार्कमध्ये  निसर्ग सौंदर्य अफाट आहे

डेन्मार्कमध्ये निसर्ग सौंदर्य अफाट आहे

ही रँकिंग 2019 नंतर प्रथमच जाहीर करण्यात आली आहे. 2023 हॅपीनेस रँकिंग 2020, 2021 आणि 2022 च्या मूल्यमापनावर आधारित आहे.

आइसलँडमध्ये तूम्हाला स्वर्ग अनुभूती येईल

आइसलँडमध्ये तूम्हाला स्वर्ग अनुभूती येईल

आनंदाच्या क्रमवारीत फिनलंड पुन्हा एकदा अव्वल क्रमांकावर आहे. त्यात दुसऱ्या क्रमांकावर डेन्मार्क आणि तिसऱ्या क्रमांकावर आइसलँड आहे. हे देश पर्यटनाच्या दृष्टीने खूप श्रीमंत आहेत आणि जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतात.

या यादीत इस्रायलला चौथे तर नेदरलँड पाचव्या क्रमांकावर आहे. इस्रायलसाठी ही मोठी झेप आहे कारण गेल्या वेळी तो 9व्या क्रमांकावर होता.

धनंजय मानेंचा परशा ज्या इस्त्राईलला गेलेला त्याच देशाचा चौैथा नंबर लागलाय

धनंजय मानेंचा परशा ज्या इस्त्राईलला गेलेला त्याच देशाचा चौैथा नंबर लागलाय

या क्रमवारीत स्वीडन सहाव्या, नॉर्वे सातव्या, स्वित्झर्लंड आठव्या, लक्झेंबर्ग नवव्या आणि न्यूझीलंड दहाव्या क्रमांकावर आहे. यापैकी एकही आशियाई देश नाही. या यादीत अमेरिका १५व्या तर ब्रिटन १९व्या क्रमांकावर आहे.

नेदरलँड हा सुंदर, समृद्ध आणि सुखी देश आहे

नेदरलँड हा सुंदर, समृद्ध आणि सुखी देश आहे

या सर्व देशांचा समावेश या क्रमवारीत होण्याला एक महत्त्वाची गोष्ट कारणीभूत आहे. ती म्हणजे पर्यटन क्षेत्र. या सर्वच देशात असलेले निसर्ग सौंदर्य, तिथली स्वच्छता, पर्यटन विकास या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

आशिया खंडातील देशांनीही त्यांच्या स्वच्छता, पर्यटन विकासावर भर दिला पाहिजे. कारण, पर्यटक जास्त आले तरच देशात नवे पैसे येतील. आणि विकासाला चालना मिळेल.