सोशल मीडियावर अनेकदा असे व्हिडिओ व्हायरल होतात की, ज्यामध्ये लोक जीव धोक्यात घालत असतात. व्हायरल होण्यासाठी हिस्त्र पशु-प्राण्यांसोबत खेळताना दिसतात. 'नशिबाने' साथ दिली तरच त्यांचा जीव वाचतो. मात्र असे असतानाही यातून बोध घेण्याऐवजी लोक त्या चुकीचीच पुनरावृत्ती करताना दिसतात.
लोकांना साप बघून घाम फुटतो. पण काही लोक असेही असतात जे सापांसोबत खेळ करतात. याचच उदाहरण दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही घाम फुटेल. (a boy dancing with king cobra video goes viral)
व्हिडीओ पाहिल्यावर अस लक्षात येते की, हा तरुण आणि साप एकमेकांचे मित्र असल्यासारखे वाटते. कोब्रा जसा डुलेलं अगदी तसेच त्याच्यासोबत नाचतोय. पण हा व्हिडीओ पाहून अनेक तरुण त्याची कॉपी करतील. पण मोठे लोक नेहमी सांगतात की साप किंवा इतर प्राण्यांना डिवचू नका. कारण त्यात जीव जाण्याचा धोकाही असतो.
हा व्हिडीओ earth.reel या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावर काही लोकांनी कमेंट करत या तरूणाला वेडा ठरवले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.