आधी विमानाच्या पंखावर चढली अन्...; घटनेचा थरारक Video Viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral

आधी विमानाच्या पंखावर चढली अन्...; घटनेचा थरारक Video Viral

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत असून एक महिला चालू असलेल्या विमानाच्या पंख्यावर चढून खाली उडी मारताना व्हिडिओत दिसत आहे. एवढे अवघड किंवा भितीदायक काम एवढ्या आनंदात करणाऱ्या महिलेचा व्हिडिओ पाहून आपल्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. तसेच या महिलेने ज्या उंचीवरून उडी मारली ते पाहून आपल्यालाही धक्का बसेल. दरम्यान, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड शेअर केला जात आहे.

या महिलेचा स्टंट पाहून आपल्याला विश्वास बसणार नाही एवढा खतरनाक हा व्हिडिओ आहे. सर्वांत अगोदर एक महिला विमानात बसलेली असते. त्यानंतर ती उठून विमानाच्या पंख्यावर जाऊन बसताना आपल्याला दिसते आणि नंतर उडी मारते. उडी मारताना ती कसलीच घाबरलेली दिसत नाही.

सदर महिला ही स्काय डायव्हिंग करत असून विमानातून उडी मारताना तिचा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. अनेक लोकांना स्काय डायव्हिंग आवडत असेल पण हे काम बघायला जेवढं छान वाटतं तेवढंच धोकादायक देखील आहे.

Web Title: Aeroplane Sky Diving Jump From Wings Video Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :viral video