
Viral : 10 वर्षानंतर नवऱ्याने केलं दुसरं लग्न; पहिल्या बायकोने रंगेहात पकडलं अन् महाभारत...
एका व्यक्तीने दोन लग्न केल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील किंवा ऐकल्या असतील. पण आपल्या पत्नीपासून चोरून दुसरं लग्न केलं तर तो गुन्हा ठरतो. पण एका तरूणाने पहिल्या बायकोला न सांगता दुसरं लग्न केलं आणि त्याच्या बायकोने दुसऱ्या पत्नीसोबत नवऱ्याला रंगेहात पकडलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ही घटना घडली आहे बिहारमधील नालंदा जिल्ह्यामध्ये. प्रेमजीत साव असं दुसरं लग्न केलेल्या व्यक्तीचं नाव असून त्याच्या पहिल्या पत्नीचं नाव जुली कुमारी तर दुसऱ्या पत्नीचं नाव अनिशा कुमारी असं आहे. तो शनिवारी बिहार शरीफ सदर हॉस्पिटलमध्ये दुसरी पत्नी असलेल्या अनिशाची प्रेग्नंसी टेस्ट करण्यासाठी आला होता. त्याचवेळी पहिली पत्नी जुली कुमारी सुद्धा या हॉस्पिटलमध्ये पोहोचली आणि हायव्होल्टेज ड्रामा झाला.
पहिल्या पत्नीने पतीला मारण्याचा प्रयत्न केला पण दुसरी पत्नी मध्ये आली. तरीही जुली हिने आपल्या पतीला चांगलंच मारलं. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी मध्यस्थी करून हे भांडण सोडवलं.
पहिली पत्नी जुली कुमारी हीचं म्हणणं आहे की, तिने प्रेमजीत याच्याशी १० वर्षापूर्वी लग्न केलं होतं आणि त्यांना दोन मुलेसुद्धा आहेत. तर प्रेमजीत म्हणाला की, मी जुली हिच्या त्रासामुळे दुसरं लग्न केलं आहे. दुसऱ्या पत्नीसोबत मी कोर्ट मॅरेज केलं असल्याचं त्याने सांगितलं आहे.