धक्कादायक! लग्न झालं, पोरंही झाली 6 वर्षांनी कळलं बहिणीशीच लग्न केलं! | After 6 years of marriage man discover that his wife is actual his sister | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रातिनिधिक फोटो

धक्कादायक! लग्न झालं, पोरंही झाली 6 वर्षांनी कळलं बहिणीशीच लग्न केलं!

जीवनात खूप वेळा अनपेक्षित घटना घडत असतात. कधीकधी असे खुलासे होतात की ते पाहून किंवा ऐकून आपल्याला धक्का बसतो. सध्या अशीच एक घटना समोर आली असून एका व्यक्तीला लग्नानंतर सहा वर्षांनी समजलं की, त्याची सहा वर्षांची पत्नी आणि त्याच्या मुलांची आई हीच त्याची बहीण आहे. हे वाचून आपल्यालाही धक्का बसला असेल.

दरम्यान, सदर व्यक्तीने Reddit या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपला अनुभव शेअर केला आहे. "आमच्या मुलाच्या जन्मानंतर माझी पत्नी आजारी पडली आणि आम्हाला समजलं की, तिला किडनी प्रत्यारोपणाची गरज आहे. त्यानंतर आम्ही तिच्या नातेवाईकांची तपासणी केली, त्यावेळी समजलं की, तिला किडनी दान करण्यासाठी एकही जुळणारा व्यक्ती नव्हता. त्यामुळे मी माझ्या पत्नीला किडनी दान करू शकेन का हे चेक करण्यासाठी चाचणी करायचे ठरवले." असं त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

"पण दुसऱ्या दिवशी मला डॉक्टरांचा फोन आला की तुमच्या अजून काही चाचण्या करायच्या आहेत. HLA (human leukocyte antigen) tissue चाचणीमध्ये आमच्यामध्ये बरेच साम्य असल्याचं मला सांगण्यात आलं पण मी त्याचा फारसा विचार न करता किडनी दान करण्यासाठी सहमत झालो आणि पुढील चाचण्या केल्या." असं त्याने सोशल मीडियावर सांगितलं आहे.

"जेव्हा या चाचण्याचे रिपोर्ट समोर आले तेव्हा कळाले की, आमच्या डीएनएमध्ये मोठ्या प्रमाणावर साम्य आहे. हे ऐकून मला धक्का बसला आणि माझा गोंधळ झाला. त्यानंतर डीएनएसंदर्भात डॉक्टरांनी मला स्पष्टीकरण दिले. एका मुलाच्या पालकांमध्ये किमान 50 टक्के आणि भावंडांमध्ये 0-100 टक्के डीएनए साम्य असू शकते. पण पती-पत्नीच्या डीएनएमध्ये साम्य येणे ही गोष्ट दुर्मिळ आहे असं डॉक्टरांनी सांगितलं." त्याने पोस्टमध्ये लिहिलं आहे.

"हे कदाचित चुकीचेही असू शकते पण ती माझी पत्नी आणि माझ्या मुलांची आई आहे. त्यामुळे मला आता काय करावे हे कळत नाही" असं तो पुढे म्हणत आहे. माझ्या जन्मानंतर मला लगेच दत्तक घेण्यात आलं असल्यामुळे मला माझ्या जन्मदात्या पालकांविषयी माहिती नसल्याचंही त्याने आपल्या पोस्टमध्ये सांगितलं आहे.

टॅग्स :wife and husband