Viral Video : सॅल्यूट! एअर होस्टेसने प्रवाशाच्या हाताला लावला मलम अन्...

Video
VideoSakal

विमानात प्रवास करताना प्रवाशांचे भांडणे झाल्याचा व्हिडिओ मागच्या दोन दिवसांत व्हायरल झाला होता. त्यामध्ये प्रवासी एकमेकांनी शिवीगाळ करत मारहाण करताना दिसत होते. तर एका व्हिडिओमध्ये एअर होस्टेस एका प्रवाशावर भडकली होती. प्रवाशाने उलटसुलट बोलल्यामुळे ती प्रवाशावर रागावली होती. त्यानंतर आता एक एअर होस्टेस प्रवाशाच्या हाताला मलम लावतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा - जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

एका प्रवाशाच्या हाताला जखम झाली असून सदर महिला त्याच्या हाताला मलमपट्टी करताना दिसत आहे. स्वत:च्या जवळच्या व्यक्तीची आपण जशी काळजी घेतो त्याप्रकारे ती त्याची काळजी घेताना या छोट्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. इरफान अन्सारी या ट्वीटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

व्हिडिओ शेअर करताना युजरने म्हटलं आहे की, प्रिय इंडिगो, या कर्मचाऱ्यांना चांगलं बक्षीस द्या, कारण ते जरी त्यांचं काम असलं तरी त्यांची काळजी पाहून असं वाटतं की आपल्या स्वत:च्या जवळची व्यक्तीसुद्धा अशी काळजी घेत नाही. या मुलींना कडक सॅल्युट... अशा आशयाचं कॅप्शन टाकून अन्सारी यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com