Viral Video : केसांच्या शेंडीचा केला फॅन अन् वाचवला उन्हाचा ताण; बच्चनने शेअर केला भन्नाट व्हिडिओ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video : केसांच्या शेंडीचा केला फॅन अन् वाचवला उन्हाचा ताण; बच्चनने शेअर केला भन्नाट व्हिडिओ

सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये एक व्यक्ती आपल्या केसांचा फॅन करून डोक्यावर हवा मारताना दिसत आहे. प्रसिद्ध अभिनेता बिग बी अमिताभ बच्चन यांनी हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

दरम्यान, सध्या उन्हाचा तडाखा वाढत असून राज्यातील अनेक भागांत तापमान ४० डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. त्यामुळे सर्वजण उन्हापासून वाचवण्यासाठी काही ना काही उपाय करत असतात. पण मुंबईतील एका तरूणाने अनोखी शक्कल लढवली आहे. त्याने टक्कल केलेल्या डोक्यावर लांबलचक शेंडी ठेवल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

रस्त्याने जात असताना या व्यक्तीने आपली लांबलचक शेंडी फिरवायला सुरूवात केली आणि त्याने स्वत:च्या डोक्यालाच हवा मारली. हे पाहून आपणही चकित व्हाल. लोकं काय काय स्टंट करतील याचा नेम नाही असंही आपण म्हणाल पण हा व्हिडिओ पाहून आपल्याला हसू आवरता येणार नाही.

दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला दोन तासांत ५ लाखांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. तर उन्हापासून वाचवण्यासाठीची तरूणाने लढवलेली शक्कल तुम्हालाही नक्कीच आवडेल.