
Anand Mahindra यांच्या इलेक्ट्रिक कारमधून Sachin Tendulkarची राईड, Video Viral
क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या सचिन तेंडुलकर याने प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांच्या एका अत्याधुनिक इलेक्ट्रिक गाडीमधून प्रवास केला आहे. हा प्रवास केल्यानंतर सचिन खूप खूश दिसत होता. त्याने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.
हेही वाचा - अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम
दरम्यान, हा व्हिडिओ शेअर करत सचिनने लिहिलंय की, पिनिनफॅरिना बॅटिस्टा कडे “ईव्ही हे भविष्य आहे का?” याचे हे अचूक उत्तर होते. हा प्रवास खूप जलद होता. आम्ही थेट भविष्यातंच उतरलो... आनंद महिंद्रा आणि त्यांच्या टीमने खूप चांगली उपलब्धी मिळवली आहे. एक अद्भुत कामगिरी केली आहे."
भारतीय कंपन्यांच्या अत्याधुनिक, जागतिक दर्जाच्या मोटारगाड्या पाहून आनंद होतो. असं सचिनने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. तर हा व्हिडिओ अनेकांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केला असून त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.