
सिंहिणीच्या जबड्यात कॅमेरा! फोटोवरील कॅप्शन वाचून आनंद महिंद्रा खूश; गिफ्टमध्ये दिला ट्रक | Anand Mahindra
उद्योजक आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह असतात. ते कायम ट्वीटरवर अनेक नवनवीन जुगाडाचे किंवा शोधाचे व्हिडिओ ट्वीट करत असतात. त्याचबरोबर चांगली माहिती पोस्ट करत असतात. त्यांनी काही दिवासांपूर्वी एका सिंहिणीचा फोटो पोस्ट केला होता. त्यामध्ये या सिंहिणीने जबड्यात कॅमेरा घेतलेला दिसत आहे.
वाईल्डलाईफ फोटोग्राफरने हा फोटो २०१८ साली काढला होता. हा फोटो पोस्ट करताना त्यांनी नेटकऱ्यांना या फोटोसाठी कॅप्शन लिहिण्यास सांगितलं होतं. जे कॅप्शन त्यांना सर्वांत चांगलं वाटेल त्यासाठी त्यांनी भेट म्हणून ट्रक देण्याची घोषणा केली होती.
ज्या नेटकऱ्याचं कॅप्शन मला आवडेल त्या व्यक्तीला मी Furio मॉडेलचा टॉय ट्रक भेट देईल. त्यासाठी ९ मे दुपारी तीन वाजेपर्यंत आपले कॅप्शन द्यावे लागतील असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं होतं.
त्यानंतर महिंद्रा यांनी ट्वीट करत हे बक्षीस जाहीर केलं आहे. निमीश दुबे यांना हे बक्षीस मिळालं असून त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. खूप चांगलं आणि छोट्या कॅप्शनसाठी निमिशचं अभिनंदन असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे.
काय आहे कॅप्शनमध्ये?
निमीश दुबे यांनी आपल्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, "Say 'cheese.' Or I will say 'lunch.'" हे कॅप्शन महिंद्रा यांना आवडले आहे. तर विजेत्याला बक्षीस पाठवण्यासाठी थेट मेसेज करण्यास सांगितले आहे.