Viral Video : लॉकडाऊनमुळे अ‍ॅपल कंपनीत खळबळ, भिंतीवरून उड्या मारत पळाले कर्मचारी

जगभरात जरी कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली असली तरी, चीनमध्ये पुन्हा एकदा वाढत्या रूग्णांमुळे संकट गडद होत आहे.
Viral Video
Viral Video Sakal

Viral News : जगभरात जरी कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली असली तरी, चीनमध्ये पुन्हा एकदा वाढत्या रूग्णांमुळे संकट गडद होत आहे. ज्या ठिकाणी रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. तेथे झिरो कोविड पॉलिसी अंतर्गत निर्बंध आणि लॉकडाऊन लादले जात आहे.

देशातील झेंगझोऊ शहरातही हीच परिस्थिती असून, येथील आयफोन निर्माता फॉक्सकॉनचा सर्वात मोठा कारखाना आहे. येथील कामगारांना झिरो कोविड पॉलिसीचा फटका बसला असून, या जाचाला कंटाळून या कंपनीतील कर्मचारी चक्क भिंतीवर चढून तेथून पळ काढत आहे. सध्या या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठया प्रमाणात व्हायरल होत आहे.

Viral Video
Viral Video : अरे देवा! चक्क अस्वलानेच धरलं मुलीला, शक्ती पेक्षा युक्तीने वाचवला जीव

चीन प्रशासनाच्या वाढत्या कठोर नियमांमुळे कंटाळून संबधित कंपनीतील कर्मचारी अशाप्रकारे भिंतीवरून उड्या मारत पळ काढत असल्याचे सांगितले जात आहे. चीनच्या मध्य हेनान प्रांतातील झेंगझू शहरातील फॉक्सकॉनच्या प्लांटमध्ये 200,000 हून अधिक कामगार कार्यरत आहेत.

Viral Video
Viral Story : इमानदार चोर; लॅपटॉप चोरला आणि महत्त्वाच्या फाईल मालकाला मेलने पाठवल्या

त्यात पुन्हा कोरोनाची प्रकरणं वाढू लागल्याने येथे झिरो कोविड पॉलिसीचा अवंलंब केला जात आहे. यामुळे येथील लाखो कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये, कारखान्यातून पळून गेलेले कामगार रात्रीच्या वेळी निर्जन रस्त्यावर आपले सामान खांद्यावर घेऊन चालताना दिसत आहेत. हे सर्व कामगार पायी आपापल्या घराकडे जाताना दिसत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com