
Viral : पठ्ठ्याने रिक्षाला बनवलं लक्झरी कार; Video पाहून हरखून जाल
सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर काही व्हिडिओमुळे आपल्याला जगातल्या अनेक गोष्टी कळतात. काही व्हिडिओ खूप माहितीपूर्ण असतात. तर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये एक रिक्षा दिसत आहे. या रिक्षाला मालकाने लक्झरी कार सारखं सजवलं आहे.
हेही वाचा - रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी
व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्यालाही डोळ्यावर विश्वास बसणार नाही पण हा रिक्षा सदर व्यक्तीने स्वातंत्र्यपूर्व काळातील गाड्यांसारखा सजवला आहे. तर त्याची आसन व्यवस्था आणि काढून टाकलेला वरचा भाग पाहून आपल्याला २० व्या शतकातील गाड्यांची आठवण होईल. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
हर्ष गोयंका यांनी हा व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून शेअर केला आहे. "जर विजय माल्ल्या यांनी कमी खर्चामध्ये तीनचाकी रिक्षा सजवली तर अशी असेल" असं विनोदी कॅप्शन त्यांनी आपल्या व्हिडिओसाठी दिलं आहे. अनेक नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.