
Viral Video : चॉकलेट मॅगीनंतर आता बाजारात आलाय केळी पिझ्झा; व्हिडिओ पाहून डोकं फिरेल
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. चॉकलेट मॅगी, अल्कोहोल आईस्क्रीम, आईस्क्रीम डोसा असे अनेक प्रकारच्या अन्नाचे व्हिडिओ आपण पाहिले असतील. लोकं एखाद्या पदार्थासोबत दुसरा पदार्थ मिक्स करून त्यामधून तिसराच पदार्थ तयार करतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
केळीपासून बनवलेला पिझ्झा हा पदार्थ आपण स्वप्नातही ऐकला नसेल. पण एका व्यक्तीने हा पदार्थ तयार केला आहे. केळीच्या पिझ्झाच्या रेसिपीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या कमेंट केल्या आहेत. हा व्हिडिओ पाहून आपलंही डोकं फिरेल.
दरम्यान, लोकं कोणत्या पदार्थापासून काय बनवतील त्याचा नेम नाही अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर अशा पदार्थांसोबत काहीतरी प्रयोग करून पदार्थाची चव घालवू नका अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. अनेकांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.