Video: नितीश कुमारांचा उडला भडका! दारु प्रश्नावर बोलताना विधानसभेत संतापले; व्हिडिओ व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nitish Kumar_Bihar

Video: नितीश कुमारांचा उडला भडका! दारु प्रश्नावर बोलताना विधानसभेत संतापले; व्हिडिओ व्हायरल

पाटणा : बिहारमधील दारुबंदीच्या मुद्द्यावरुन विधानसभेत विरोधीपक्ष नेत्यावर मुख्यमंत्री नितीश कुमार पहिल्यांदाच भयंकर भडकलेले दिसले. याचा व्हिडिओ समोर आला असून यामध्ये ते तावातावानं बोलताना दिसत आहेत. (Bihar CM Nitish Kumar loses his temper in State Assembly video viral)

बिहारच्या सारणमध्ये विषारी दारु पिऊन मृत्यू झालेल्या लोकांची संख्या १४वर पोहोचली आहे. या मुद्द्यावरुन बिहारमध्ये राजकारण सुरु झालं आहे. बिहार विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजयकुमार सिन्हा यांनी विषारी दारुमुळं झालेल्या मृतांचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सभागृहात आपलं नियंत्रण गमावलं आणि ते प्रचंड भडकलेले दिसले.

हे ही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

नितीशकुमार सभागृहात भडकले

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमारनं त्यावेळी विधानसभेत आपलं नियंत्रण गमावलं. जेव्हा विरोधीपक्ष नेते विजयकुमार सिन्हा यांनी छपरा इथं विषारी दारुवर प्रश्न उपस्थित केले.