Bihar Station : पटना स्टेशनवरील 'त्या' Porn Videoची चर्चा सातासमुद्रापार! 'तीने'देखील केलं ट्वीट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bihar patna railway station

Bihar Station : पटना स्टेशनवरील 'त्या' Porn Videoची चर्चा सातासमुद्रापार! 'तीने'देखील केलं ट्वीट

पटना : बिहारच्या पटना रेल्वे स्टेशनवरील जाहिरातीच्या स्क्रीनवर लागलेल्या पॉर्न व्हिडिओमुळे सगळीकडे खळबळ उडवली आहे. रविवारी टीव्ही स्क्रिनवरील सामान्य जाहिरात बदलून त्याच स्क्रिनवर एका अॅडल्ट मूव्हीची जाहिरात सुरु झाली होती. ही व्हिडीओ क्लिप तब्बल 3 मिनिटांची होती.

ही जाहिरात रविवारी सकाळी सुमारे साडे नऊ वाजताच्या सुमारास स्क्रिनवर सुरु होती. या प्रकारानंतर प्रवाशांनी वेळ न घालवता लगेच सरकारी रेल्वे पोलिस (जीआरपी) आणि रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) कडे तक्रार केली होती. या घटनेची चर्चा सध्या संपूर्ण देशभरात सुरू आहे.

दरम्यान, केंड्रा लस्ट या पॉर्नस्टारचा व्हिडिओ या स्क्रीनवर लागला होता असा दावा नेटकऱ्यांकडून करण्यात येत आहे. तर केंड्रा हिने या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली असून तिने ट्वीटरवर एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोवर India असं कॅप्शन असून #BiharRailwayStation असा हॅशटॅग देण्यात आला आहे. तिच्या या फोटोला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या असून सध्या केंड्रा हिच्या ट्वीटची चर्चा आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे अधिकाऱ्यांनी रेल्वे स्थानकावरील टीव्ही स्क्रीनवर जाहिराती दाखवण्यासाठी एजन्सीला दिलेले कंत्राट रद्द केले आहे. याप्रकरणी रेल्वे विभाग स्वतंत्रपणे चौकशी करत आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ प्लॅटफॉर्म क्रमांक 10 वर चालला होता, यावर काही अधिकाऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तेव्हा या संपूर्ण प्रकरणाचा रेल्वे विभागाकडून आता तपास सुरु आहे.

टॅग्स :Biharcrimepatna