BJP MLA-Gautami Patil Dance: संदीपभाऊंचा विषय लय हार्ड हाय... भाजप आमदार गौतमीसोबत 'चांदी के डाल पर...' थिरकले, व्हिडिओ व्हायरल

Viral Video of BJP MLA Dr. Sandip Dhurve Dancing with Gautami Patil Sparks Controversy: गौतमी पाटीलच्या नृत्याने हा महोत्सव गाजला असला तरी, भाजप आमदारांच्या या वर्तनावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. पूरस्थितीत आपत्तीग्रस्तांना मदत करण्याऐवजी नेत्यांच्या या प्रकारच्या वर्तनामुळे त्यांनी लोकांचा रोष ओढवून घेतला आहे.
 BJP MLA Dr. Sandeep Dhurve dancing with Gautami Patil on 'Chandi Ke Daal Par...' at a grand Dahi Handi festival in Yavatmal.
BJP MLA Dr. Sandeep Dhurve dancing with Gautami Patil on 'Chandi Ke Daal Par...' at a grand Dahi Handi festival in Yavatmal.esakal
Updated on

यवतमाळ: जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर असताना, भाजपचे आमदार मात्र नाचगाण्यात दंग असल्याचे दृश्य उमरखेड येथे पाहायला मिळाले. आर्णी-केळापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलसोबत ‘चांदी के डाल पर…’ या गाण्यावर थिरकताना सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

गौतमी पाटीलची लोकप्रियता सोशल मीडियावर मोठी आहे, त्या यवतमाळच्या उमरखेड येथे भाजप नेत्यांनी आयोजित केलेल्या भव्य दहीहंडी महोत्सवात सहभागी झाल्या होत्या. या महोत्सवात आर्णीचे आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी नृत्य करून सर्वांना आश्चर्यचकित केले. गौतमीसोबत त्यांनी 'चांदी के डाल पर...' या प्रसिद्ध गाण्यावर ठेका धरला, ज्यामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

आमदारांचा व्हिडिओ व्हायरल

आमदार संदीप धुर्वे यांचा गौतमीसोबत नृत्य करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पूरपरिस्थितीमध्ये आमदारांनी असा कार्यक्रम आयोजित करून नृत्य केल्याने काही ठिकाणी नाराजी व्यक्त केली जात आहे. व्हिडिओमध्ये आमदार धुर्वे आणि गौतमी पाटील यांच्या नृत्याने एकच चर्चा निर्माण झाली. 

महोत्सवातील प्रमुख आकर्षण गौतमी पाटील

उमरखेड येथे आयोजित दहीहंडी महोत्सवात गौतमी पाटील हे प्रमुख आकर्षण होते. या महोत्सवाचे आयोजन आमदार नामदेव सासाने आणि भाजप समन्वयक नितीन भुतडा यांनी केले होते.  यवतमाळ जिल्ह्याचे संघटनात्मक प्रभारी प्रल्हादसिंग पाटील यांचीही या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.

 BJP MLA Dr. Sandeep Dhurve dancing with Gautami Patil on 'Chandi Ke Daal Par...' at a grand Dahi Handi festival in Yavatmal.
Off Air Serial: स्टार प्रवाहवर नव्या मालिकांची मांदियाळी; 'या' लोकप्रिय मालिका घेणार निरोप? वाचा कुणाचा पत्ता होणार कट

विरोधकांची टीका

भाजप आमदारांच्या या कृत्यावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. पूरस्थितीत नागरिकांची मदत करण्याऐवजी भाजप नेत्यांनी अशा प्रकारच्या कार्यक्रमात सहभागी होणे हे अनुचित असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. विशेषत: सामाजिक माध्यमांवर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांमध्ये याबद्दल नाराजीचा सूर उमटत आहे.

 BJP MLA Dr. Sandeep Dhurve dancing with Gautami Patil on 'Chandi Ke Daal Par...' at a grand Dahi Handi festival in Yavatmal.
Hasan Mushrif: "पवारसाहेब तुमसे बैर नही, समरजीत तुम्हारी खैर नही"; मुश्रीफांनी आव्हान स्वीकारलं, विधानसभेपूर्वी फुंकलं रणशिंग 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com