
Video Viral : धोका! सॉरी बोलायला GFच्या घरी गेला; तिच्यासोबत घरातून दुसराच बाहेर आला
खरं प्रेम म्हणजे काय हो? आपल्याला खरं प्रेम मिळावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. अनेकांना खरं प्रेम मिळत नाही तर काहींचा प्रेमभंग होतो. काही नशीबवान माणसांना जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत साथ देणारे लोकं भेटतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका तरूणीने तिच्या जुन्या प्रियकराला धोका दिल्याचं दिसत आहे. पहिल्या प्रियकरासोबत भांडणे झाल्यानंतर ती दुसऱ्या प्रियकरासोबत रिलेशनमध्ये आल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. figen या ट्वीटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
एक तरूण एका घरासमोर त्याच्या प्रेयसीला सॉरी बोलण्यासाठी येतो. यावेळी तो एक साऊंड घेऊन येतो आणि गाणं म्हणत घरासमोर उभा राहिला आहे. आवाज ऐकून तरूणी बाहेर येते पण ती घरातून बाहेर आल्यानंतर तिच्या पाठीमागून तिचा दुसरा बॉयफ्रेंड बाहेर येतो. हे पाहून या तरूणाला रडू येते आणि तो रडत रडत गाणं म्हणू लागतो. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल.
दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. "हा खूप मोठा धोका आहे, अशा तरूणींना हाणलं पाहिजे, भावा तुझ्या दु:खामध्ये आम्ही सहभागी आहोत" अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर शेअर केलं जात आहे.