
Viral Video : मोर, लांडोर की खेकडा…नेमकं हे आहे काय? डान्स बघून नोरा फतेहीलाही घाम फुटेल
सोशल मीडियाच्या जगात केव्हा कधी काय व्हायरल होईल माहिती नाही. दररोज अनेक व्हिडीओ पोस्ट व्हायरल होत असातात. त्यात डिजेच्या तालावर नाचणारी पोरं म्हटलं की विषय खोल होऊन जातो. गाव खेड्यातील लग्न असो की शहरातील पार्टी लोक नाचणं विसरत नाहीत. बरं या व्हिडीओमध्ये डान्स देखील अगदी पाहण्यासारखाच असतो. कोंबडा, नागिण आता मोर-लांडोर देखाल अशा डान्स व्हिडीओत दिसायला लागले आहेत.
डीजेच्या तालावर धूंद होऊन नाचणारी तरुण पोरं काय स्टेप्स करतील याचा नेमच राहिला नाहीये. असाच एक भन्नाट व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहूण तुम्ही देखील पोट धरून हसल्याखेरीज राहणार नाहीत एवढं मात्र नक्की.
व्हिडीओत नेमकं आहे तरी काय?
हा व्हिडीओ एका पार्टीतला असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडीओत काही तरून बेभाण होऊन नाचत आहेत सोबतच एकमेकांचा उत्साह वाढवताना देखील दिसत आहेत. त्यानंतर एक जण खेकडा अन् दुसरा मोर किंवा लांडोर यापैकी एक बनलेला दिसून येतोय. त्यांच्या या अनोख्या स्टेप्स पाहून हसू आवरणार नाही.
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. योगेश क्लब Yogesh_club नावाच्या युजरने शेअर केला आहे. अगदी काही सेकंदांचा हा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल होत आहे. दोन लाखाहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे.
या व्हिडीओती खासियत म्हणजे एकदा का तुम्ही हा व्हिडीओ पाहिलीत की तुम्ही तुमच्या मित्रांना पाठवल्याशिवाय राहु शकत नाहीत. या व्हिडीओच्या कमेंटबॉक्समध्ये लोक कमेंट देखील मजेशीर करत आहेत. येथे देखील अनेकांची मजेशीर कमेंट करण्यासाठी चढाओढ लागल्याचं दिसतं आहे.