Viral Video : 'भूकंप झाला तरी चालेल पण नाचायचंच'! नवरीचा भर पावसात छत्री घेऊन डान्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dance

Viral Video : 'भूकंप झाला तरी चालेल पण नाचायचंच'! नवरीचा भर पावसात छत्री घेऊन डान्स

काही जणांना गायनाचं, डान्सचं, वादनाचं किंवा कुठल्यातरी कलेचा नाद असल्याचं आपल्याला माहिती असेल. आपल्यातील कला सादर करण्यासाठी काही कलाकारांना व्यासपीठाची गरज नसते. तशाच पद्धतीने डान्स करणाऱ्याला सुद्धा व्यवस्थित गाण्याची किंवा स्टेजची आवश्यकता नसते.

सध्या एका नवरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये नवरी आपल्याच लग्नामध्ये भर पावसात डान्स करताना दिसत आहे. अंगावर पाऊस पडू नये यासाठी तिने हातात छत्री घेतली आहे पण डान्स थांबवला नाही. नवरीचे डान्सचे वेड पाहून आपणही थक्क व्हाल. या नवरीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून नेटकऱ्यांकडून या व्हिडिओला पसंती मिळत आहे. "मंडप लावला आहे, त्याचे पैसे वसूल झाले पाहिजेत. मग पावसात का भिजणं होईना काय फरक पडत नाही, भूकंप झाला तरी चालेल पण नाचायचंच" अशा विनोदी कमेंट नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर केल्या आहेत.

लग्नातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामध्ये डान्स, नवरदेव, नवरी यांच्या व्हिडिओचा सामावेश असतो. पण हा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

टॅग्स :marriagedanceviral video