
Video Viral : भर मंडपात नवरीचा मूड बदलला, लग्नास दिला नकार; नवरीविनाच नवरदेव घरी
पटना : बिहारमधीर भागलपूर येथे भर लग्न मंडपात तरूणीने नवरदेवासोबत लग्न करण्यास नकार दिल्याचा प्रकार समोर आला आहे. हे प्रकरण भागलपूरच्या रसूलपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडले असल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
अधिक माहितीनुसार, लग्नाची सर्व तयारी झाली असताना वरात मंडपात आली आणि वरमाला घालण्यासाठीची तयारी सुरू होती. पण नवरीने नवरदेवाला समोर पाहिलं अन् तिचा मूड बदलला. तिने नवरदेवाच्या गळ्यात माळ घालण्यास नकार दिला. त्यामुळे सर्वजण स्तब्ध झाले. वऱ्हाडी मंडळींना काय करावं तेच समजेना.
"हा मुलगा माझ्यापेक्षा वयाने खूप मोठा आहे. तो काळासुद्धा आहे. एवढ्या मोठ्या मुलासोबत मी लग्न करणार नाही" असं सांगत या मुलीने भर मंडपात लग्नास नकार दिला. तर बळजबरीने माझं लग्न लावून दिलं तर मी नंतर आत्महत्या करेन अशी धमकीही मुलीने दिली. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी नवरीला समजावण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही फायदा झाला नाही. या प्रकारानंतर नवरदेव नवरीविनाच घरी पोहोचला आहे.