Video: "विजय मामा... हाय! मी ऋषी..." राष्ट्राध्यक्ष सुनक यांनी कुणाला केला Video Call? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rushi Sunak

Video: "विजय मामा... हाय! मी ऋषी..." राष्ट्राध्यक्ष सुनक यांनी कुणाला केला Video Call?

भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे अध्यक्ष झाले आहेत. त्यानंतर आता ते नेमकं भारतातील आहेत, पाकिस्तानातील आहेत की दक्षिण आफ्रिकेतील आहेत यावरून वाद सुरू झाले आहेत. तर त्यांनी आता भारतातील विजय मामाला व्हि़डिओ कॉल केलाय. त्यांच्या या व्हिडिओ कॉलचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

(Rushi Sunak vijay mama video call video viral)

तर सुनक यांच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ कॉलमध्ये सुनक हे विजय मामाला बोलत आहेत. "विजय मामा, हाय... मी ऋषी... तुम्ही कसे आहात? जेव्हा तुम्ही इकडे याल तेव्हा याला सांगा... मग आपण भेटू" असं ऋषी सुनक म्हणत आहेत. तर संजय रैना यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्वीटरवरून पोस्ट केला आहे.

दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील विजय मामा कोण आहेत असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे. तर अनेक नेटकऱ्यांनी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून मामा विजय मल्ल्या असल्याचं सांगितलं आहे. तर अनेकजणांकडून हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.

टॅग्स :global newsvideo viral