
सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये सीसीटीव्ही, डान्स, लग्न अशा व्हिडिओंचा सामावेश असतो. सध्या असाच एक व्हिडिओ ट्वीटरवर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये दोन बैलांची सुरू असलेली टक्कर सोडण्यासाठी एका पठ्ठ्याने थेट तीन चाकी ऑटो रिक्षा दोन बैलांच्या मध्ये घुसवली आहे.
हा व्हिडिओ ट्वीटरवर शेअर करण्यता आला असून एका गल्लीत दोन बैलांची टक्कर सुरू असल्याचं यामध्ये दिसत आहे. तर अनेक लोकं उभे राहून पाहत आहेत पण या बैलांची टक्कर सोडवण्यासाठी कुणीच पुढे सरसावत नाही. त्यानंतर एक रिक्षावाला थेट रिक्षा घेऊन येतो आणि दोन्ही बैलांच्या मध्ये घुसवतो. पण त्यातील एक बैल थेट रिक्षालाच धडक देतो. बैलाच्या धडकेत रिक्षाची जागेवर पलटी होते.
दरम्यान, रिक्षा पलटी झाल्यानंतर दोन्ही बैल पळून जातात. रिक्षा चालक रिक्षाला उभी करण्याचा प्रयत्न करतो, तेवढ्यात तिथे तीन चार लोकं पळत येतात आणि रिक्षा उभी करण्यासाठी मदत करतात. बैलांची झुंड सोडवण्याच्या नादात या रिक्षाचालकाने रिक्षाचे नुकसान करून घेतले आहे. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.