मांजर आणि कुत्रा हे पारंपारिक विरोधक प्राणी आहेत. कधीही कुत्रा समोर दिसला की मांजराची पळता भुई थोडी होते. तर अनेकांनी आपल्या घरात कुत्रे आणि मांजर सोबत पाळल्यामुळे त्यांच्यातील वैर आता संपत चालले आहे. पण एका घरातील मांजर आणि कुत्र्यातील वैऱ्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(Dog vs Cat Viral Video)
हेही वाचा : राष्ट्र तरेल कसे? धर्मकारणातून की धर्मनिरपेक्षतेतून?
व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा एका घरातील असून कुत्रा आणि मांजराचे भांडण चालू आहे. नेहमीप्रमाणे मांजरावर धावून जाणारा कुत्रा मात्र मांजराला भित असताना या व्हिडिओत दिसत आहे. तर काही वेळ कुत्रा तिच्या अंगावर धावून जाण्याचा आव अंगात आणत असल्याचं आपल्याला दिसत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.
हा मजेशीर व्हिडिओ पाहून आपल्यालाही हसू आवरणार नाही. दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांना शेअर केला आहे. तर यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावरील या व्हिडिओमुळे मनोरंजन होत असते. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जातात.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.