Christmas : ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर ट्वीटरवर हिंदू ट्रेंड; नेमकं काय आहे प्रकरण?

Trends
TrendsSakal

सध्या जगभरात ख्रिसमसचा उत्साह सुरू आहे. तर भारतात हिंदू ट्रेंड करत आहे. ट्वीटरवरील अनेक युजर्सने यासंदर्भात ट्वीट करत #Hindu हा हॅशटॅह वापरला आहे. तर ख्रिश्चन लोकं त्यांच्या चर्चमध्ये हिंदू सण साजरा करत नाहीत तर मग हिंदू लोकं मंदिरामध्ये ख्रिसमस का साजरा करतात असा प्रश्न नेटकऱ्यांनी केला आहे.

हेही वाचा - Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

उत्तरप्रदेशमधील काशी येथील घाटावर ख्रिसमसचे सिलेब्रेशन केल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्याचबरोबर रामकृष्ण मठातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये येशूच्या फोटोची पूजा केली जात असल्याचं दिसत आहे. तर नेटकऱ्यांनी या व्हिडिओर टीकेची झोड उठवली आहे.

Trends
TrendsSakal

दरम्यान, महाराष्ट्र आणि देशभरात अनेक लोकं ख्रिसमस साजरा करत असतात. आपण भारतामध्ये सर्वधर्मसमभाव आहे. तर आपण इतर धर्माच्या सन्मानासाठी त्यांचे सण साजरे करतो पण ख्रिश्चन धर्मातील लोकं दिवाळी का साजरी करत नाहीत? असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com