Video Viral : रिकामा रस्ता, मध्यरात्र अन् खांबाखाली जोडप्याचा भन्नाट डान्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video

Video Viral : रिकामा रस्ता, मध्यरात्र अन् खांबाखाली जोडप्याचा भन्नाट डान्स

काही लोकं भन्नाट असतात. त्यांना आपल्याला कोण काय बोलेल याचं काही घेणं देणं नसतं. खरं तर आपल्या आयुष्यात लोकांच्या बोलण्याचा फरक पडू द्यायचा की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो. अशाच प्रकारचा एका जोडप्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये ते भान विसरून रस्त्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहेत.

(Couple Dance on Road Viral Video)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ हा रात्रीचा आहे. एक तरूण आणि तरूणी अंधाऱ्या रस्त्यावर असलेल्या लाईटच्या खांबाखाली भन्नाट डान्स करत आहेत. तर त्यांना पाहणारे किंवा बोलणारे तिथे कुणीही असल्याचं दिसत नाही. त्यांचा हा भन्नाट व्हिडिओ शेजारी असलेल्या इमारतीवरील कुणीतरी शूट केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालताना दिसत आहे.

हेही वाचा: Video Viral : सरकारी दवाखान्याचा पराक्रम! थेट ICU वॉर्डमध्ये घुसली गाय

दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचा साधन झाले असून त्यावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांनी शेअर केला आहे.

यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जातात.

टॅग्स :danceviral video