Trending News : दोन बायका फजिती ऐका; कोर्टाने करार करत दोघींनाही वाटून दिला नवऱ्याचा वेळ

या कराराचे उल्लंघन झाल्यास पहिली पत्नी न्यायालयात जाऊ शकते.
Marriage
Marriagesakal

मध्य प्रदेशातल्या ग्वाल्हेर इथल्या एका २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीयरने आपल्या दोन्ही बायकांसोबत करार करुन आपला वेळ दोघींमध्ये समान विभागला आहे. आठवड्यातले तीन दिवस एकीसोबत तर पुढचे तीन दिवस दुसरीसोबत राहण्याचं काँट्रॅक्ट त्याने केलं आहे.

या इंजिनीयरने दोन्ही बायकांना स्वतंत्र फ्लॅटही दिला आहे. दोन्ही पत्नींपासून त्याला मुलं आहे. हा पेच सोडवण्यासाठी जानेवारी २०२३ मध्ये ग्वाल्हेर कौटुंबिक न्यायालयाने नियुक्त केलेले समुपदेशक हरीश दिवाण यांनी सांगितले की, २६ वर्षीय महिलेने मे २०१८ मध्ये या व्यक्तीशी लग्न केलं. हा माणूस गुरुग्राममधील एका कंपनीत कामाला होता आणि हे जोडपं तिथंच राहत होतं. त्यांना एक मुलगाही झाला.

Marriage
Trending News : सहा मुलींची लग्न झाली, आता जेवण कोण बनवणार?"; साठीत आजोबा बनले नवरोबा

२०२० मध्ये कोरोनाची साथ आल्यानंतर हे जोडपं ग्वाल्हेरला आलं आणि तो घरुन काम करू लागला. काही काळ ग्वाल्हेरमध्ये राहून ते गुरुग्रामला परतले. परिस्थिती पूर्ववत होऊनही तो आपली पत्नी आणि मुलाकडे परतला नाही. हे पाहून पत्नीने चौकशी केली असला तिला कळलं की २०२१ मध्ये आपल्या पतीने दुसऱ्याच मुलीशी लग्न केलं आहे.

Marriage
Mumbai News : वांद्रे रेल्वे स्थानकावर तैनात महिला पोलिसांचीच काढली छेड; व्हिडीओ व्हायरल

या इंजिनीयरची दुसरी पत्नी त्याच्याच सोबत काम करते. तिनेही एका मुलीला जन्म दिला. हे कळताच पहिल्या पत्नीने पोटगीसाठी ग्वाल्हेर येथील कौटुंबिक न्यायालयात खटला दाखल केला. न्यायालयाने वकील आणि समुपदेशक हरीश दिवाण यांना मंगळवारी होणाऱ्या सुनावणीपूर्वी तडजोड करण्याचा प्रयत्न करण्यास सांगितले.

दिवाण यांनी त्या व्यक्तीशी बोलून त्याला सांगितले की पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसऱ्या स्त्रीशी लग्न करणे हिंदू विवाह कायद्यानुसार दंडनीय आहे. पहिल्या पत्नीने एफआयआर दाखल केल्यास त्याची नोकरीही जाऊ शकते. त्यानंतर तिन्ही पक्षांनी न्यायालयाबाहेर करार करण्याचं मान्य केलं.

Marriage
Lawrence Bishnoi: त्याने जेलमधून मुलाखत दिली? पोलिसांनीच आता स्पष्टपणे सांगितलं...

करारानुसार, पुरुषाला आठवड्यातील तीन दिवस त्याच्या एका पत्नीसोबत आणि पुढचे तीन दिवस दुसऱ्यासोबत घालवावे लागतात. रविवारी मात्र त्याला कोणासोबतही राहण्याचं बंधन नाही. दिवाण यांच्या मते, कराराचे उल्लंघन झाल्यास पहिली पत्नी न्यायालयात जाऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com