
लहान मुलाला वाचवण्याच्या नादात गंभीर जखमी; स्टेडियमवरील थरारक Video Viral
वेस्टइंडीज आणि दक्षिण आफ्रिकेच्या दरम्यान सध्या टी२० सामने खेळले जात आहेत. या संघादरम्यान खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने जवळपास २५९ धावांचे लक्ष्य आरामात पार केले. तर विशेष म्हणजे गोलंदाजी सुरू असताना वेस्ट इंडीजचा खेळाडू पॉवेल चांगलाच दुखापती झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
वेस्ट इंडीज संघाची गोलंदाजी सुरू असताना एक सीमारेषेबाहेर जाणारा बॉल अडवण्यासाठी पॉवेल याने प्रयत्न केला पण सीमारेषेजवळ एक लहान मुलगा असल्यामुळे तो त्याला वाचवण्याच्या नादात समोर लावलेल्या एलईडी स्क्रीनवर जाऊन पडला. त्यामध्ये त्याला मोठी दुखापत झाली.
दरम्यान, ही घटना दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी सुरू असताना तिसऱ्या षटकांत घडली. यामध्ये लहान मुलाला कोणतीही दुखापत झाली नाही. पण पॉवेल याला दुखापत झाल्यानंतर प्राथमिक उपाचार घेऊन तो परत खेळण्यासाठी मैदानावर आला होता. पण समोरच्या संघाने दिलेले २५९ धावांचे लक्ष्य इंडीज संघाने पार करत सामन्यावर विजय मिळवला.