Viral Video : लाल दिव्याच्या गाडीवर बसून बनवलं रील; पोलिसांनी दाखवल्या खाक्या

हा व्हिडिओ आरोपींनी त्यांच्या इंस्टाग्रामवर अपलोड केला आहे.
Viral Video
Viral VideoSakal

कानपूर : उत्तरप्रदेशमधील कानपूर येथे दोन तरूणांनी पोलिसांच्याच गाडीवर बसून रील बनवलं आहे. या रीलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या तरूणांची ओळख पटवली असून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलला आहे. पण सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Viral Video
Ajit Pawar : चपटीसाठी काय पण! अजित पवारांनी सांगितला भन्नाट किस्सा

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोन तरूण उत्तरप्रदेश पोलिसांच्या लाल दिव्याच्या गाडीच्या बोनेटवर बसून रील बनवताना दिसत आहेत. ते आळीपाळीने गाडीच्या बोनेटवर बसून शूट करत आहेत. तर हा व्हिडिओ त्यांनी इंस्टाग्राम अकाउंटला शेअर केला आहे. त्यानंतर पोलिसांनी या घटनेवर स्पष्टीकरण दिलं आहे.

दरम्यान, "ही गाडी दुरूस्तीसाठी गॅरेजवर लावली होती. गाडी दुरूस्त करत असताना या तरूणांही हे कृत्य केलं असावं, आता त्यांची ओळख पटली असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. बोनेटवर बसलेल्या आरोपीचं नाव फैसल असून तो गुंड कल्लू याचा भाऊ असल्याची माहिती आहे." असं स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com