Crocodile Viral Video : बाबो... चक्क मगरीला पाठीवर घेऊन चाललाय चिमुकला l Crocodile Viral Video boy carrying baby crocodile on his back | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crocodile Viral Video

Crocodile Viral Video : बाबो... चक्क मगरीला पाठीवर घेऊन चाललाय चिमुकला

Crocodile Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नसतो. अन् बऱ्याचदा इथे असं काही आढळतं की, ते बघून तुमचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. काही लोक स्वतःच व्हायरल होण्यासाठी काही केवीलवाणे प्रयत्न करत असतात. पण काही गोष्टी बघितल्यावर निसर्गाच्या किमयेने आवाक व्हायला होतं.

असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यात एक लहानसा मुलगा असं काही करताना दिसत आहे की, कदाचित जे आधी कधी बघितलं नसेल.

छोटा बच्चा जान के हम को... हे गाणं तुम्ही ऐकलंच असेल. तेच जणू काही हा मुलगा सिद्ध करत आहे. या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, एवढासा हा चिमुकला चक्क मगरीच्या पिल्लाला पाठीवर घेऊन चालताना दिसत आहे. तिथे प्रत्यक्ष बघणाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. जंगलात गेलेला हा मुलगा परत येताना त्याच्या पाठीवर हे मगरीचं पिल्लू होतं. यामुलाने त्या मगरीचे पुढचे पाय पकडून पाठीवर घेतलेलं होतं जसं अखाद्या धान्याच्या पोत्याला किंवा बकरीच्या पिल्लाला घेऊन जात आहे, एवढ्या सहज तो चालताना दिसत आहे.

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर भारी धुमाकूळ घालत आहे. याला हजारोंनी लाइक्स आणि व्ह्यूव्हज मिळत आहेत. पण हा व्हिडीओ कधीचा आणि कोणत्या भागातला आहे याची माहिती देण्यात आलेली नाही. bilal.ahm4d नावाच्या इंस्टाग्राम हँडलवरून व्हिडीओ टाकण्यात आला आहे.