Cup Tapping Viral Video : कौतुकास्पद! चिमुकलीनं वाजवली कप टॅपिंगवर कन्नड संतवाणी, बघून लागेल वेड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Girl Cup Tapping Viral Video

Pune Girl Cup Tapping Viral Video : कौतुकास्पद! चिमुकलीनं वाजवली कप टॅपिंगवर कन्नड संतवाणी

Cup Tapping Viral Video : सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओज व्हायरल होत असतात. त्यातून जगात किती प्रकारचे लोक असतात हे समजतं. पण आज आम्ही असा एक व्हिडीओविषयी सांगणार आहोत ज्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळेत तर अनेकांना कौतुकही वाटेल.

अनुश्री काळे ही १० वर्षांची चिमुरडी स्वतःचं यूट्यूब चॅनल चालवते. त्यात ती तिच्या वेगवेगळ्या कलागुणांचे व्हिडीओज टाकत असते. तिचा असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. कन्नड संत शिशुनल्ला शरीफ नावाचं १९ व्या शतकात एक संत होऊन गेले. त्यांच्या संतवाणीवर हा कप टॅपिंग व्हिडीओ आहे. 'लोकं द काळजी...' असा हा अभंग आहे.

हेही वाचा: Viral Video : लॉकडाऊनमुळे अ‍ॅपल कंपनीत खळबळ, भिंतीवरून उड्या मारत पळाले कर्मचारी

कन्नड गायक रघू दीक्षित यांनी हे गाणं फेमस केलं आहे. अनुश्रीला ट्रेकींग, पेंटींग, गायन अशी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आवड असल्याने तिचा मित्रपरिवारही मोठा आहे. त्यातूनच तिला कपटॅपिंग विषयी समजलं. यूट्यूबवर बघून ही पठ्ठी तासाभरात कप टॅपिंग शिकलीसुध्दा. पण हा व्हिडीओ बघून कोणालाही यावर विश्वास बसणार नाही.

हेही वाचा: Viral Video : अरे देवा! चक्क अस्वलानेच धरलं मुलीला, शक्ती पेक्षा युक्तीने वाचवला जीव

त्यामुळे व्हिडीओ बघून तुम्हालाही तिचं कौतुकच वाटेल. आणि आपल्याही मुलांनी असं काही क्रिएटीव्ह करत रहावं याची प्रेरणाही मिळेल.

टॅग्स :viral video