Viral Video : मुलगी असावी तर अशी! बर्थडेला दिलेलं गिफ्ट पाहून बाप गहिवरला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video : मुलगी असावी तर अशी! बर्थडेला दिलेलं गिफ्ट पाहून बाप गहिवरला

मुलगी आणि बापाचं नात अतूट असतं. मुलगा जरी वडिलांनी उलटं बोलत असला तरी मुलगी आपल्या बापाला समजून घेते. ती आपल्या बापाला सगळ्यात जास्त जीव लावते असं म्हणतात. आपल्या वडिलांना त्यांना जे हवं आहे ते गिफ्ट द्यावं असं सगळ्याच मुलींचं स्वप्न असतं. त्यामुळे त्या धडपडत असतात.

हेही वाचा - प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

अशाच एका मुलीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रिदा थराना या मुलीने आपल्या वडिलांच्या वाढदिवसाच्या दिवशी अनोखं गिफ्ट दिलं आहे. त्यांना आवडणारी त्यांची ड्रीम कार गिफ्ट दिली आहे. हा व्हिडिओ तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. तिने आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की, माझ्या वडिलांना वाढदिवसाचं गिफ्ट देण्यासाठी मी १०० पेक्षा जास्त युट्यूब व्हिडिओ पाहिले.

दरम्यान, रिदाने वाढदिवसाच्या दिवशी आपल्या वडिलांच्या हातात गाडीची किल्ली दिल्यानंतर वडील खूश झाले आहेत. तर तिने इंस्टाग्रावर त्यांच्यासाठी भावनिक पोस्ट लिहिली आहे. मुलीने दिलेलं गिफ्ट पाहून वडिलांनाही गहिवरलं आहे. जीवनात पहिल्यांदा मी तुमच्या प्रेमात पडले असं ती यामध्ये लिहित आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केला आहे.