Viral Video : बर्फ गोठल्याने हरणाचं तोंड झालं बंद, मरण तोंडाशी आलं अन्... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Deer

Viral Video : बर्फ गोठल्याने हरणाचं तोंड झालं बंद, मरण तोंडाशी आलं अन्...

संकटकाळी मदत करणारे अनेक लोकं आपण पाहिले असतील. अनेकजण मुक्या प्राण्यांचे जीव वाचवत असतात तर अनेकवेळा अनोळख्या व्यक्तीने मदत केल्यामुळे आपल्याला जीवदान मिळत असतं. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये काही लोकं हरणाला जीवदान देताना दिसत आहे.

हेही वाचा - जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका हरणाचे तोंड गोठलेल्या बर्फामुळे बंद झाल्याचं दिसत आहे. तर हरणाला श्वास घेता येत नसल्यामुळे तो हैराण झाला आहे. तो सैरावैरा पळत असताना दोन प्रवासी त्याच्याजवळ जातात आणि त्याच्या तोंडावरील बर्फ काढताना दिसत आहेत. तर त्यांच्या या कामगिरीमुळे एका निष्पाप हरणाचा जीव वाचला.

हेही वाचा: Sachin Tendulkar: चुलीवरची भाकर, कष्टाची चव; क्रिकेटचा देव शेताच्या बांधावर

दरम्यान, प्रवाशांनी हरणाच्या तोंडावरील बर्फ काढल्यामुळे तो धाप देत आहे. तर शेवटच्या टप्प्यात जीव वाचल्यामुळे तो उड्या मारत निघून जात आहे. तर एका निष्पाप जनावराचा जीव वाचवल्यामुळे हरणानेही प्रवाशांचे आभार मानले असतील. संकटकाळी असे देवदूतासारखे अवतरून हरणाला वाचवणाऱ्या प्रवाशांना सलाम...!