
Viral Video : दिल्ली मेट्रोत हातात बूट, बाटली घेऊन महिला भिडल्या; एकमेकांना भिजवलं
दिल्ली मेट्रोमधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मेट्रोमध्ये अश्लील कृत्य करणारे व्हिडिओ, सतरंजी घेऊन झोपणारे तरूण, पाण्याने अंघोळ करणारे तरूण, डान्स करणारे आणि भांडणाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आता भांडणाऱ्या महिलांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोन महिला चालू मेट्रोमध्ये भांडताना दिसत आहेत. महिलांच्या डब्ब्यामध्ये हा प्रकार घडला असून बाकीच्या महिला बसून त्यांचा हा प्रकार बघत आहेत. एका महिलेच्या हातामध्ये पाण्याची बॉटल असून दुसरीच्या हातात बूट आहे. काही वेळानंतर एका महिलेने दुसऱ्या महिलेच्या अंगावर पाणी टाकलं आहे.
दरम्यान, ट्वीटरवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओला जवळपास २ हजार नेटकऱ्यांनी लाईक केलं असून जवळपास ३५० जणांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. नेटकऱ्यांनी या व्हिडिओला चांगलीच पसंती दिली असून मोठ्या प्रमाणावर शेअर केला आहे.