Viral Video : मेट्रोतच युवतीने सुरू केला डान्स; मागचे काका बावरले, घाबरले, बघतंच राहिले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dance

Viral Video : मेट्रोतच युवतीने सुरू केला डान्स; मागचे काका बावरले, घाबरले, बघतंच राहिले

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी, डान्स, लग्न, अपघात, सीसीटीव्ही, जंगली प्राण्यांचे व्हिडिओ अशा व्हिडिओंचा सामावेश असतो. सध्या दिल्ली मेट्रोतील एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये एक तरूणी चालत्या मेट्रोमध्ये डान्स करताना दिसत आहे.

दिल्ली मेट्रो म्हणजे आजकाल मनोरंजनाचं साधन बनलं आहे अशी टीका नेटकरी आजकाल करत आहेत. कारण दिल्ली मेट्रोमध्ये अश्लील चाळे करणाऱ्यांचे, अंघोळ करणाऱ्यांचे, सतरंजी घेऊन झोपणाऱ्यांचे, जागेसाठी भांडणे करणाऱ्या महिलांचे आणि रीलसाठी डान्स करणाऱ्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

त्यातच सध्या डान्स करणाऱ्या तरूणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तिचा डान्स पाहून आजूबाजूचे लोकं आश्चर्यचकित झाले आहेत. तर तिच्या पाठीमागे उभे असलेल्या काकांची प्रतिक्रिया पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

दरम्यान, या तरूणीचा डान्स पाहून पाठीमागे उभे असलेले काका अचानक घाबरले आणि बावरले सुद्धा. तर तिच्या अदा आणि डान्समुळे काका तिच्याकडे पाहतंच राहिले. सुरूवातीला ते काहीसे घाबरल्यासारखे दिसले पण त्यांनी या तरूणीवरील नजर हटवली नाही हे विशेष.

सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ट्वीटरवरील Hasna Jaruri Hai या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.