
Viral Video : पार्सल द्यायला झाला लेट! फुकट दिलं नाही म्हणून महिलांची डिलीव्हरी बॉयला जबर मारहाण
मागच्या अनेक दिवसांपासून डिलीव्हरी बॉय आणि ग्राहकांमधील वाद समोर येताना दिसत आहेत. अनेकदा डिलीव्हरी बॉय ग्राहकांपर्यंत योग्य ते पार्सल पोहोचवत नाहीत त्यामुळे ग्राहक रागावून डिलीव्हरी बॉयला मारहाण करतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून पार्सल द्यायला काही मिनीटे उशीर झाल्यामुळे या महिलांनी डिलीव्हरी बॉयला जबर मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडिओमध्ये दोन महिला स्विगी डिलीव्हरी बॉयला मारत असताना एक तरूण मध्यस्थी करताना दिसत आहेत.
दरम्यान, डिलीव्हरी बॉयला पोहोचायला काही वेळ उशीर झाल्यामुळे महिला ग्राहकाने सदर डिलीव्हरी बॉयकडे पार्सल मोफत देण्याची मागणी केली. पण डिलीव्हरी बॉयने नकार दिल्यानंतर या महिलांनी त्याला मारण्यास सुरूवात केली.
काही वेळाने एका तरूणाने मध्यस्थी केली. पण महिलांनी मारहाण सुरूच ठेवल्याने तरूणानेसुद्धा महिलांना फटके मारले आहेत. तरूणाच्या मध्यस्थीमुळे डिलीव्हरी बॉयची सुटका झाली आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत तर महिलांवर टीका केली आहे. हा व्हिडिओ ट्वीटरवर शेअर करण्यात आला असून चांगलाच व्हायरल झाला आहे.