Viral : दोन्ही हात नाहीत तरीही जिद्द पाहा; हा Video खूप काही शिकवून जाईल

Viral Video
Viral VideoSakal

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यापैकी काही व्हिडिओमधून आपल्याला खूप काही शिकायला मिळत असतं. सध्या अशाच एका तरूणाच्या जिद्दीचा व्हिडिओ व्हायरल होत असून या फोटोग्राफरचा व्हिडिओ पाहून आपणही थक्क व्हाल.

Viral Video
Viral Video : "ऐसा कैसा चोर बनेगा रे तू?" चोरी करायला गेला अन् पँट फिटेपर्यंत...

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका फोटोग्राफरचा आहे. त्याला दोन्हीही हात नसून तो लग्नातील फोटो काढताना दिसत आहे. हात नसतानाही तो सगळी कामं स्वत: करतो. हा व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवतो. जीवन कसं जगायचं हे या तरूणाकडून शिकलं पाहिजे. सगळ्या सुखसुविधा असताना रडत बसणाऱ्यांना या तरूणाकडे पाहून खूप काही शिकायला मिळेल.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com