Viral Video : हॅलो मी गुड्डू कुत्रा बोलतोय! 'त्या' व्हिडिओचा धुमाकूळ

आता कुत्रेही फोनवर बोलू लागले आहेत.
Viral Video
Viral VideoSakal

अनेकांच्या घरात पाळीव कुत्रे असतात. तर अनेकजण कुत्र्यांना घरातील छोटीमोठी कामे शिकवत असतात. दररोज माणसांत राहून तेही माणसांचे अनुकरण करू लागतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका कुत्र्याचा व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये तो फोनवर बोलताना दिसत आहे.

Viral Video
मातृप्रेम! फक्त आईच लेकरावर असा जीव लावू शकते; 'त्या' आईचा भावूक Video Viral

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, एक महिला फोनवर बोलत असताना कुत्रा कान टवकारून समोरच्या व्यक्तीचं बोलणं ऐकत आहे. तर समोरून एक महिला गुड्डू नावाच्या कुत्र्याला उद्देशून बोलत आहे. समोरून महिला बोलल्यानंतर गुड्डू नावाचा कुत्रा विव्हळताना दिसत आहे. फोनवरील महिलेच्या बोलण्याला हा कुत्रा अशा प्रकारे रिप्लाय देताना पाहून आपणही थक्क व्हाल.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com