Viral Video : असाही खेळ बहरला! कुत्र्यांमध्ये रंगला हॉलीबॉलचा सामना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video : असाही खेळ बहरला! कुत्र्यांमध्ये रंगला हॉलीबॉलचा सामना

अनेकांच्या घरी पाळलेले कुत्रे असतात. तर अनेकजण त्यांना घरातील कामं शिकवत असतात. कुत्रे इमानदार आणि हुशार असतात पण काही कुत्रे खोडकरही असतात. सध्या कुत्र्यांच्या कळपाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये ते हॉलीबॉल खेळताना दिसत आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक कुत्र्यांचा कळप फुग्यासोबत खेळताना दिसत आहे. त्यातील काही कुत्रे फुगा खाली आल्यानंतर त्याला उडी मारून परत हवेत उडवत आहेत. तर या फुग्यासोबत जणू ते हॉलीबॉलच खेळत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. "वेळ कशीही असो, आयुष्यात असा आनंद घेता आला पाहिजे हे या कुत्र्यांकडून शिकलं पाहिजे" अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.