
Viral Video : कारमधून आला डॉगी नवरदेव, पालखीतून आली नवरी; कुत्र्यांच्या ग्रँड लग्नाची वरात
लोकं आपल्या पाळीव कुत्र्याबरोबर काय करतील त्याचा नेम नाही. अनेकजण त्याला आपल्या ताटात जेवायला बसवतात, त्याला कपडे घालतात. तर अनेकजण त्याला आपल्या घरातील कामे शिकवतात. सध्या एका कुटुंबाने कुत्र्याचा विवाह लावल्याचं समोर आलं असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये कारमधून नवरदेवाची वरात आणि पालखीतून नवरीची वरात येताना दिसत आहे. या लग्नासाठी मोठा हॉल बुक केला असून भव्य मंडप उभारण्यात आला आहे. त्याचबरोबर अनेक पाहुणेमंडळींना जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. एकमेकांना हार घालत या कुत्र्यांचे लग्न लावण्यात आले आहेत. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होतोय.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.
सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.